Dhangekar Urges CM Fadnavis to Investigate Jain Boarding Irregularities Saam
मुंबई/पुणे

'ना मोहोळांवर - ना भाजपवर माझा राग, पण...'; केंद्रीय मंत्र्यांविरोधात रान उठवणारे रवींद्र धंगेकर नेमकं काय म्हणाले?

Dhangekar Urges CM Fadnavis to Investigate Jain Boarding Irregularities: पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन हडपण्याच्या प्रकरणावरून नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. या प्रकरणात शिंदे पक्षाचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर टीका केली आहे.

Bhagyashree Kamble

  • जैन बोर्डिंग जमीन प्रकरणामुळे राजकीय वादंग.

  • रवींद्र धंगेकर यांच्याकडून भूमीका स्पष्ट.

  • “माझा राग भाजपवर नाही, विकृतीवर आहे.”

पुण्यात सध्या भाजपविरूद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना, अशा २ पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना टार्गेट करत आहेत. हा वाद खरंतर जैन बोर्डिंग जमिनीच्या प्रकरणामुळे उभा राहिला आहे.

यासंदर्भात पुण्यातील भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर यांनी आपली भूमीका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितलं की, "माझा राग मुरलीधर मोहोळ यांच्यावर किंवा भाजपवर नाही. माझा राग विकृतींवर आहे", असं धंगेकर म्हणाले.

जैन बोर्डिंग जमीन प्रकरणाबाबत रवींद्र धंगेकर म्हणाले, 'पुणेकरांच्या हितासाठी जे आहे, ते मी बोलणारच. मी पक्षावर बोलत नाही मी विकृती वर बोलतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, ज्यांनी कुणी जैन बोर्डिंग जमीन हडप करण्याचा प्रयत्न केलाय, त्यांची सखोल चौकशी करावी', अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

'मी टीकेला घाबरत नाही, महावीर देवाचे मंदिर गहाण ठेवलं तर मी बोलायचं नाही का?', असा सवालही धंगेकर यांनी उपस्थित केला. 'माझा मोहोळ यांच्यावर राग नाही, विकृतीवर राग आहे. महापालिकेत, शासनाच्या टेंडरमध्ये सगळीकडे विकृती, सगळीकडे लुटायचं आणि खायचं', असंही धंगेकर म्हणाले. 'जैन बोर्डिंगमध्ये सगळ्या कंपनी मॅनेज झाल्या आहे. रेशन काढायला साधारण १५ दिवस लागतात. इकडे कर्ज वगैरे काढून झाले', असा दावा धंगेकर यांनी केला.

'मी चुकीचं असेल तर, भाजपच्या कार्यकर्त्यांनी येऊन मला सांगावं. मी चुकतोय. माझी इच्छा आहे की त्यांनी माझी तक्रार करावी. पण भाजपच्या विकृतींनी तक्रार करू नये', असं रवींद्र धंगेकर म्हणाले. 'मला भाजपच्या आणि इतर पक्षाच्या खासदार नेत्यांनी फोन केला तर मी त्यांना नक्की भेटायला जाईन. अनिल शिरोळे यांनी बोलावलं तर मी नक्की जाईन. पण मला अड्डा, गुथ्थावाल्यांनी बोलावलं तर मी जाणार नाही', असंही धंगेकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सक्षम ताटे खून प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयीन कोठडी

Sindhudurg Travel : समुद्र, किल्ला अन् हिरवागार निसर्ग; सिंधुदुर्गतील Hidden ऐतिहासिक ठिकाण

Vicky Kaushal : कतरिना कैफने दिली गुडन्यूज; विकी कौशलनं लेकासाठी खरेदी केली करोडो रुपयांची लग्जरी कार, पाहा VIDEO

Eknath Shinde : "सोन्याची अंडी देणारी कोंबडी पकडून ठेवली..." एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर तिखट टोला

Special Trains : गुड न्यूज! महाराष्ट्रातून धावणार १४ स्पेशल ट्रेन, मुंबई-पुण्यातून किती अन् कोणती ट्रेन धावणार?

SCROLL FOR NEXT