Sanjay Raut News Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut Bail: जामीन मंजूर झाल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास होता, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसांनंतर संजय राऊत बाहेर येणार आहेत. जामीन मंजूर जाल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रियाही समोर आली आहे.

माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास होता. मी न्यायदेवतेचे आभार मानते. मी पुन्हा लढेन, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी संजय राऊतांनी आत्मविश्वास व्यक्त केला होता. (Latest Marathi News)

संजय राऊत जेलमधून थेट जाणार लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यासमोरील हनुमान मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे. तिथून सिद्धिविनायक मंदिर, बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ येथे जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आजच रात्री ते उद्धव ठाकरेंच्याही भेटीला जाणार आहेत.

संजय राऊतांच्या स्वागतासाठी आर्थर रोड जेल बाहेर पाच वाजता शिवसैनिकडून भव्य बाईक रैली काढण्यात येणार आहे.

संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्याची बातमी ऐकल्यानंतर त्यांच्या आई भावूक झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते. संजय राऊतांच्या घरी विद्यूत रोषणाई देखील केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT