Sanjay Raut Bail: संजय राऊतांना जामीन मंजूर, रोहित पवारांच्या ट्वीटची राज्यभर चर्चा

वाघ बाहेर येत असल्याचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.
Sanjay Raut-Rohit Pawar
Sanjay Raut-Rohit PawarSaam TV
Published On

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी 100 दिवसांनंतर कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जल्लोष केला जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्वीट करुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. वाघ बाहेर येत असल्याचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. (Latest Marathi News)

Sanjay Raut-Rohit Pawar
Sanjay Raut : सर्वात मोठी बातमी! शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर

 संजय राऊत यांना जामीन मिळणे हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. गेल्या १०० दिवसांपासून संजय राऊत पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र, आतापर्यंत पीएमएलए कोर्टाने त्यांना दिलासा दिलेला नव्हता.

Sanjay Raut-Rohit Pawar
Deepali Sayyed : ठाकरे गटाला आणखी एक धक्का! दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील, वाघाचा फोटो ट्वीट केला आहेत. अंबादास दानवे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, माननीय न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना जमीन मंजूर केला आहे. न्यायालयाचे मनःपूर्वक आभार. विरोधकांनी आता आपल्या राजकीय सतरंज्या संभाळाव्यात. आणि हो, कोंबड्यांनी आपली पिल्ले घेऊन आता खुराड्यात जाण्याची वेळ आली आहे.

शिवसेनेची तोफ पुन्हा धडाडणार- आदित्य ठाकरे

संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्याने शिवसेनेची तोफ पुन्हा धडाडणार आहे. ते कोणत्याही कारवाईला घाबरले नाहीत. राऊत गद्दार झाले नाहीत, ते कोणत्याही कारवाईला घाबरले नाहीत. झालेल्या कारवायांना ते सामोरे गेले, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com