sanjay raut Saam Tv
मुंबई/पुणे

वेळ आल्यास बहुमत सिद्ध करू; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील : संजय राऊत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं आहे

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांसह शिवसेनेतून बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. शिवसेनेकडून (Shivsena) हे बंड मोडीत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackreray) यांनी सुद्धा आज आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बंडखोरांना प्रत्युत्तर दिलं. त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता वर्षा बंगला सोडणार असून मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारांसोबत बोलताना दिली आहे. यासोबतच आम्ही लढत राहू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं आहे. (Sanjay Raut Latest News)

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर संध्याकाळी शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना संजय राऊत यांनी शिवसेना आणि पर्यायानं महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे आपली भूमिका मांडल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना थेट आव्हान दिलं आहे.

वेळ आली तर सभागृहात आम्ही बहुमत सिद्ध करु असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. इतकंच नाही तर मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच राहतील असंही राऊत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. इतकंच नाही तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा निवास्थान सोडून मातोश्रीवर राहण्यासाठी निघाले असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. "मोह, माया, सत्ता, याचा आम्हाला अजिबात लोभ नाही, आम्ही लढणारे लोकं आहोत, आम्ही लढत राहू शेवटी सत्याचा विजय होईल" असं संजय राऊत म्हणालेत.

पुढे बोलताना संजय राऊ म्हणाले आहे की, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर राहण्यासाठी जात आहे. त्यामुळे काही लोकांना असं वाटत असेल की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पदाचा त्याग करतील, पण परत एकदा सांगतो की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील. वेळ आल्यास आम्ही बहुमत सादर करू", असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT