एकनाथ शिंदे यांचे पुन्हा ट्विट... या ४ महत्त्वाच्या मुद्द्यांमधून उद्धव ठाकरेंना नेमके काय सांगितलं?

बंडखोर आमदारांनी समोर येऊन सांगितलं तर या क्षणी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे,असं आवाहन केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray and Eknath Shinde Saam Tv

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि काही बंडखोर आमदारांनी महाराष्ट्र सोडून गुवाहटीत मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे राज्यात राजकीय घडमोडींना वेग आला आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. या लाईव्हदरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackreray) यांनी बंडखोर आमदारांनी समोर येऊन सांगितलं तर या क्षणी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे,असं आवाहन केलं आहे. उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. (Eknath Shinde Latest News In Marathi )

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. हिंदूत्व आणि मुख्यमंत्रीपदावरून भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत चार महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहे. शिंदे म्हणाले,' गेल्या अडीच वर्षात मविआ सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला, आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे-शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे'. असं ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या फेसबुक लाईव्हनंतर हे ४ मुद्दे अधोरेखित केले आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?

यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवरही भाष्य केले. उद्धव ठाकरे म्हणाले, बंडखोर आमदारांनी समोर येऊन मला राजीनामा मागावा, मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, फक्त गुवाहटीला गेलेल्या आमदारांनी येऊन माझा राजीनामा घेऊन राजभवनात द्या. मला कोरोना झाला आहे म्हणून मी राजभवनात जाऊ शकत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

जोपर्यंत माझ्यासोबत शिवसैनिक आहे, तोपर्यंत मी घाबरत नाही.

'पुन्हा आगतिकपणा नाही. लाचारीचा प्रसंग नाही, मजबुरी तर अजिबात नाही. सत्ता नसताना अनेक आव्हाने आम्ही पेलली आहेत. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसैनिक आहे, तोपर्यंत मी घाबरत नाही. आव्हानाला पाठ दाखवणारे आम्ही नाही. शिवसैनिकांनाही आवाहन करतो, मी शिवसेनेचे नेतृत्व करण्यास लायक नाही हे सांगणारे शिवसैनिकांनी सांगावे. मी हे पद सोडायला तयार आहे. मी मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मला मान्य आहे. समोर येऊन एकदा सांगा, सांगा असंही उद्धव ठाकरे (Uddhav Tahckeray) म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com