Uddhav Thackeray
Uddhav Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray: फडणवीस-राज-राणा-सोमय्यांवर काय बोलले मुख्यमंत्री; वाचा सविस्तर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'हल्ली अनेकजण भगवी शाल पांघरुन बाळासाहेब झालेत'

* महाराष्ट्रला बदनाम करण्याची तयारी सुरु आहे. तुम्ही भ्रष्टाचारी आहात, भ्रष्टाचाराचे प्रकरणं समोर येत आहेत. तुम्ही या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी सोबत बसू, सोबत काम करु असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

* मुख्यमंत्र्यांनी मुन्नाभाई चित्रपटाचे उदाहारण देऊन राज ठाकरेंवरती नाव न घेता टीका केली आहे. हल्ली एकाला बाळासाहेब झाल्यासारखे वाटते आहे. बाळासाहेबांची शाल घालून फिरत आहेत, फिरु द्या आपल्याला काही फरक पडत नाही. राज्याचे अनेक प्रकल्प केंद्राने मुद्दाम अडवून धरले आहेत. पुरातत्व विभागाने आपले अनेक कामं अडवून धरले आहेत. औरंगजेबाच्या कबरीचे संवर्धन केले जाते मग आपल्या मंदिराचे काम का रोखता? तिकडे जाऊन बोला असे मुख्यमंत्री म्हणाले आहे.

* क्रिकेटमधला एक किस्सा सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता किरीट सोमय्यांवरती टीका केली आहे. खोटे गुन्हे दाखल कराल तर हा महाराष्ट्र पेटेल. ईडी, सीबीआय लावत असाल खोटे गुन्हे दाखल करत असाल तर महाराष्ट्र पेटेल असे मुख्यमंत्री म्हणाले. आता तरी सुधरा, तिकडे श्रीलंकेत काय सुरु आहे पाहा, रावणानाची लंका का पेटली ते पाहा....आमचे हिंदुत्व घर पेटवणारे नाही तर घर बसवणारे पाहिजे.

तुमची टोपी भगवी, RSS ची काळी का? मुख्यमंत्री

* मुख्यमंत्र्याकडून सकाळच्या शपथविधीवर टीका. आम्ही काँग्रेससोबत गेलो कारण तुम्ही आम्हाला दूर केले. मी विधानसभेत सांगितले आहे, मला सत्तेची लालच नाही. मुख्यमंत्र्याकडून सकाळच्या शपथविधीवर टीका. आम्ही काँग्रेससोबत गेलो कारण तुम्ही आम्हाला दूर केले. मी विधानसभेत सांगितले आहे, मला सत्तेची लालच नाही. याच भाजपने मुफ्ती मोहम्मद यांच्यासोबत सरकार स्थापन केले होते.

* मुफ्ती मोहम्मद यांच्यासोबत सरकार स्थापन केले अभिनंदन. बाबरी पाडायला गेलो होते असे फडणवीस म्हणाले होते, तेव्हा तुमचे वय काय होते? सहलीला गेले होते का? देवेंद्रची तुम्ही जर खरच बाबरी मशिद पाडायला गेला असता तर तुमच्या फक्त वजनाने बाबरी पडली असती अशी टीका फडणवीसांवर केली आहे.

* देवेंद्रजी फक्त तुमच्या वजनाने बाबरी पडली असतीः मुख्यमंत्री मागच्या भाषणाला भगवी टोपी घालून भाषणं केली. हिंदुत्व डोक्यावर नाही तर डोक्यात पाहीजे. तुमची टोपी जर भगवी असेल तर मग RSS ची टोपी काळी का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला आहे.

* मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे कौतुक केले आहे. आमच्या मुंबई महापालिकेने तुमच्या तोडीचे काम केले आहे. उद्या दाऊदलाही पक्षात घेतील. दाऊदला मंत्रीही करतील अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. बाबरी पाडली तेव्ही तुमची वितभर नव्हे तर मैलभर पळापळ झाली होती. होय आमच्या हिंदुत्वाचा अर्थ हृदयात राम आणि हाताला काम असं आहे. आपला महाराष्ट्र स्टार्टअप मध्ये एक नंबर झाला आहे. हे यांना देखवत नाहीये.

हो आम्ही युतीत २५ वर्ष सडलोच- मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे भाषण

* तुमच्या प्रमाणे मला मोकळं वाटतंय. बऱ्याच दिवसांपासून बोलायचे होते. छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करतो. खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला आपल्या सोबत होता, ते आता देशाची दिशा भरकटवत आहेत. गदा पेलायला हातात ताकद पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

* तुमच्या १७६० पिढ्या आल्या तरीही मुंबई स्वतंत्र होणार नाही. कोणीही आले तरी ही मुंबई स्वतंत्र होऊ देणार नाही. बुलेट ट्रेन कशाला हवीये, कोणाल हवीये. तुम्हाला मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे.

* मागे खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्यासोबत होता, ते देशाची दिशा भरकटवत आहेत असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, बाळासाहेबांना देवळात घंटा बडवणारा हिंदू नको होता तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे होता. आपले हिंदुत्व गदाधारी आहे, इतरांचे घंटाधारी आहे. बसा बडवत घंटा. काय मिळालं, घंटा. असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

* आम्ही २५ वर्ष युतीत सडलोच. हाच का तो मित्र ज्याला २५ वर्ष बाळासाहेबांनी सांभाळले होते. सामनामध्ये जे येते ते येणारच. आम्ही कधीच सामना मध्ये नरेंद्र मोदींबद्दल चूकीचं काही लिहीत नाही. ७० पैशांनी पेट्रोल वाढले तेव्हा अटल बिहारी वाजपेयी बैलगाडीने गेले होते, ती भाजप कुठे आहे?

* काश्मीरी पंडीतांवर हल्ले होत आहेत. तेव्हा का गप्प बसले आहात. मुख्यमंत्र्याची केंद्रावर टीका. संभाजी नगरचे नामकरण करण्याची काय गरज, आहेच संभाजी नगर. कोणाच्या हातात भोंगा, कोणाच्या हात हनुमान चालीसा देता. आणि भाजप मजा पाहात बसता. भाजपवरती नाव न घेता टीका. काही झालं की आम्ही टोमॅटो स्वास लावणार आणि पत्रकार परिषद घेणार, नाव न घेता किरीट सोमय्यांवर टीका.

आजची शिवसेनेची सभा शंभर सभांची बाप- संजय राऊत

संजय राऊत भाषण

* आपल्या तोफा नेहमी धडाडत असतात. आपले मुख्यमंत्री फार मोठा दारुगोळा घेवून मंचावर येणार आहे. आजची शिवसेनेची सभा शंभर सभांची बाप असेल. आजची सभा सांगते की मुंबईची बाप शिवसेना. आमचा बाप हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. संजय राऊतांचे भाषण सुरु असतानाच मंचावर मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले.

* शिवसेनेचे हिंदुत्व छत्रपती संभाजी महाराजांसारखे आहे. संजय राऊतांनी अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर टीका केली आहे. ओवेसींचा धिक्कार करतो. २०१४ पासून ओवेसी महाराष्ट्रात येत आहे, तेव्हा तुम्ही का नाही रोखले. अनेक वेळा ओवेसी औरंगजेबासमोर नतमस्तक झाले आहेत, तेव्हा तुम्ही झोपले होते का?

* काश्मीरमधला हिंदू सगळ्यात जास्त खतरेमे आहे. राहुल भट्ट यांची हत्या करण्यात आली. या हत्येचा निषेश करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या काश्मिरी पंडीतांवर अश्रुच्या नळकांड्या टाकण्यात आल्या. कोणामुळे हिंदुत्व धोक्यात आले आहे ते तुम्ही ठरवा.

15 जूनला आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार...

....म्हणून शिवसैनिकांसमोर आदित्य ठाकरे नतमस्तक झालो- आदित्य ठाकरे 

मला जनतेमध्ये हनुमान दिसले, मला जनतेमध्ये भगवान राम दिसले. आज आम्ही सत्तेमध्ये बसलो आहेत ते फक्त तुमच्या आशीर्वीदाने. आम्ही सर्व महाराष्ट्र पिंजून काढला होता. कोरोनामध्ये आम्ही खूप चांगले काम केले, असे मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. निवडणुकी आधी तुमच्याकडे आलो, तुमचा आशीर्वाद मिळाल्यामुळे सरकारमध्ये बसलो म्हणून आज नतमस्तक झालो. मुख्यमंत्री बोलणार आहेत, संजय राऊत बोलणार आहेत, जोरदार बॅटिंग होणार आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.

दहशतवादी संघटनांनी जीवे मारण्याची धमकी दिली तरी बाळासाहेब घाबरले नाही- एकनाथ शिंदे

शिवसेनेचा जन्म मराठी माणसावरचा अन्याय दूर करण्यासाठी झाला आहे. हिंदुस्थानात आपण हिंदू आहोत हे सांगायला लाज वाटायची तेव्हा गर्व से काहो हिंदू है हा नारा बुलंद केला. त्यामुळे त्यांना पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी जीवे मारण्याची धमकी दिली पण ते कधी घाबरले नाही. अनेकजण सोयीने शब्द फिरवतात, वाक्य अडचणीत आणत आहे अस कळल्यावर मी अस बोललो नाही अस भ्याडपने बोलतात असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

गुलाबराव पाटलांनी सांगितला 'शिवसेना' शब्दाचा संपूर्ण अर्थ

मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवरती जहरी टीका केली आहे.

शि- शिस्तबद्ध

व- वचनबद्घ

से- सेवाभावी

ना- नामर्दांना जिथं स्थान नाही

असा अर्थ गुलाबराव पाटलांनी शिवसेनेचा सांगितला आहे.

गुलाबराव पाटलांनी त्यांच्या खास शैलीत टीका केली आहे. जोपर्यंत चंद्र, सुर्य आहेत तोपर्यंत शिवसेना संपू शकत नाही असे पाटील म्हणाले आहेत. दोन अडीच वर्षाच्या सरकारच्या काळात घटना घडत आहे. पक्षातील लोक फोडताना बघतो. या पक्षातील माणूस दुसऱ्या पक्षात जातो. काही लोकं आपल्यावर मोठी झाली त्यांना बोलणार नाही असेही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. (Gulabrao Patil Speech)

हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व- सुभाष देसाई

शिवसेनेच्या सभेला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्रा राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी भाषण केले. त्यांनी राज ठाकरे, भाजपवरती टीका केली. शिवसेनेच्या वाटेला जाऊ नका, शिवसेनेची ताकद आज सर्वांना दिसली आहे. हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे सुभाष देसाई म्हणाले आहेत.

या प्रमुख मुद्द्यांवर उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता

मागच्या काही दिवसात विरोधकांनी शिवसेनेवरती जोरदार टीका केली होती. यासर्व टीकांना उत्तर देणार असे उद्धव ठाकरे उत्तर देणार म्हणाले होते. खालील प्रमुख मुद्द्यांवर उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता आहे.

1. शिवसेनेचे नकली हिंदुत्व आहे अशी टीका झाली होती.

2. मशिदीवरील भोंग्यांवरुन शिवसेनेला घेरण्याचे प्रयत्न झाला होता.

3. मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत.

4. राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.

5. भाजपाच्या बुस्टर सभेमधून फडणवीसांनी शिवसेनेला टार्गेट केले होते.

6. नवनीत राणा आणि रवी राणा प्रकरण

शिवसेनेची मुंबईत जाहीर सभा; मंचावर दिग्गज नेते हजर

शिवसेनेची मुंबईमध्ये जाहीर सभा होत आहे. या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेले आहे. या सभेसाठी मंचावर शिवसेने प्रमुख नेते उपस्थीत आहेत. यामध्ये संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, दादा भुसे, गुलाबराव पाटील, अरविंद सावंत, उदय सामंत, विनायक राऊत, अनिल देसाई, सुभाष देसाई, आदेश बांदेकर, मंचावर उपस्थित आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dark Circles Removal : डोळ्यांवरील डार्कसर्कल १० मिनीटांत होतील गायब

Maharashtra Election: राज्यातील १३ जागांवर ठाकरे गटविरुद्ध शिवसेना,तर १५ जागेवर काँग्रेसची भाजपशी लढत

Chanakya Niti: यश प्राप्त करायचंय? चाणक्याची ही रणनिती लक्षात ठेवा

Amitabh Bachchan: कोस्टल रोड, अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट; भाजप अन् आदित्य ठाकरेंमध्ये रंगलं ट्विट वॉर

Investment Tips: गुंतवणूक करताना 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT