uddhav Thackeray News  saam tv
मुंबई/पुणे

उद्धव ठाकरेंचे अमित शाह यांच्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, 'गणपती हा बुद्धीदाता...'

'गणपती हा बुद्धीदाता आहे, त्यांनी सर्वांना सुबुद्धी द्यावी, अशा शब्दात ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर

Uddhav Thackeray News : राज्यात सत्तानंतर झाल्यानंतर भाजप-शिवसेनेचा राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. 'उद्धव ठाकरेंना आता जमीन दाखवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. शाह यांच्या टीकेला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'गणपती हा बुद्धीदाता आहे, त्यांनी सर्वांना सुबुद्धी द्यावी, अशा शब्दात ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज, मंगळवारी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. आमदार भास्कर जाधव यांची नेतेपदी निवड झाल्यानंतर ते ठाकरे यांची भेट घ्यायला आले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली.

'मुंबईत काल मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती बघितले. काल गणपतीच्या मंडपात देखील राजकारण दिसलं. गणपती जिथे आहे, तिथे काही बोलू नये. काल मंडपात बोलून गेले. गणपती हा बुद्धीदाता आहे. त्यांनी सर्वांना सुबुद्धी द्यावी. जमीन दाखवायची ती दाखवा, आम्ही त्यावेळी बोलू. थोडक्यात हा संघर्षाचा काळ आहे, अशा शब्दात ठाकरे यांनी अमित शाह यांच्या टीकेला उत्तर दिलं.

'ते शिवसेना संपवायला निघाले आहेत. निष्ठा ही कितीही बोली लावली तरी विकली जाऊ शकत नाही. पसाराभर नासलेली लोक असल्यापेक्षा मूठभर निष्ठावान असतील, तर मैदान जिंकू शकतो. ही काय माझी खासगी मालमत्ता नाही. मुख्यमंत्रिपद हवं असतं, तर मी क्षणभरात सोडलं नसतं. तसं असतं तर माझ्याकडे तेव्हाही ३०-४० आमदार होते. तेव्हाही त्यांना डांबून ठेवलं असतं. माझेही ममता बॅनर्जी ओळख होती. त्यांना तिकडे घेऊन गेलो असतो. किमान कालीमातेच्या मंदिरात नेलं असतं. राजस्थानात त्यांना नेता आलं असतं पण तो माझा स्वभाव नाही. त्यामुळे सर्वांना सांगितलं की, दरवाजा उघडा आहे. राहायचं असेल तर निष्ठेने राहा, नसेल तर तिकडे जा. आता माझ्यासोबत निष्ठावंत कडवट शिवसैनिक आहेत, असेही ठाकरे म्हणाले.

दसरा मेळाव्यावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले, 'दसरा मेळावा शिवाजी पार्क येथेच घ्यायचा आहे. तिथे सविस्तर बोलेन. आतापर्यंत मुख्यमंत्रिपदाचा मास्क असायचा, बोलताना जपून बोलावं लागायचं. आता तसं नाहीये'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

SCROLL FOR NEXT