Shivsena Vs Rana: शिवसेनेची नवनीत राणांवर जहरी टीका; 'एका सी ग्रेड फिल्ममध्ये काम करणाऱ्या...'

'आपण एक सी ग्रेड फिल्ममध्ये काम करणाऱ्या अभिनेत्या आहात, आपला आणि हनुमान चालीसाचा संबंध काय?'
Navneet Rana Vs Uddhav Thackeray
Navneet Rana Vs Uddhav ThackeraySaam TV
Published On

निवृत्ती बाबर -

मुंबई: नवनीत राणा (Navneet Rana) जरा तोंड सांभाळून बोला, एका सी ग्रेड फिल्ममध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्या आहात. एक आमदार आपल्यावर भाळला आणि राजकारणात आपला चंचू प्रवेश झाला. हनुमान चालीसाचा आणि तुमचा संबंध काय? हनुमानाला हनुमान का म्हणतात? याचं साधं उत्तर आपल्याला देता आलं नाही आणि म्हणे मी हनुमान भक्त, अशी जहरी टीका ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना घाडी (Sanjana Ghadi) यांनी नवनीत राणा यांच्यावर केली आहे.

राणा दाम्पत्य आणि ठाकरे यांच्यामधील वाद काही कमी होण्याची चिन्ह दिसतं नाहीत. ठाकरेंवरती सतत टीका करणाऱ्या नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सत्तेचा दुरुपयोग केला. तुरुंगामधून निघाल्यावर त्यांना वाटलं मी तुटून जाईल. त्यांच्याविषयी काही बोलणार नाही असं उद्धव ठाकरेंना वाटलं.

मात्र, ज्या दिवशी तुरुंगामधून मी बाहेर पडले. त्यावेळी माझ्यात जास्त ताकद आली. तुरुंगात मी १४ दिवस, बारा-बारा तास हनुमान चालिसेचं पठण केलं. माझ्या भक्तीत थोडी जरी ताकद असेल, तर हनुमंत राय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवेल.

पाहा व्हिडीओ -

आता त्यांच्या घरात उभं राहायला सुद्धा कार्यकर्ता उरला नाही”, अशा शब्दात राणा यांनी टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला आता ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना घाडी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

आपण एक सी ग्रेड फिल्ममध्ये काम करणाऱ्या अभिनेत्या आहात, आपला आणि हनुमान चालीसाचा संबंध काय? भाजपाच्या सी आणि डी टीम म्हणून काम करणाऱ्या मनसेच्या नेत्यांनी भोंग्यांच्या विषयासाठी मशिदीसमोर हनुमान चालीसा वाचा म्हणून सांगितलं. तुम्ही डायरेक्ट आमच्या मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचायला निघालात.

ज्या बाईला लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेलं मातोश्री या मंदिरातला आणि मशिदीतला फरक कळत नाही. त्या बाईला आणखी कशी वागणूक मिळायला पाहिजे होती? तुम्ही म्हणाला 'शिवसेनेने (Shivsena) काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली. म्हणून मातोश्री आणि मातोश्रीचे विचार हिंदुत्ववादी आणि बाळासाहेबांचे राहिले नाहीत.'

पण याच मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंनी मुस्लिम कुटुंबीयांना त्यांची नमाजाची वेळ झाल्यानंतर नमाज अदा करण्याची विनंती केली होती. हे तुमच्यासारख्या 'मुंबईची मुलगी' म्हणून घेणाऱ्या बाईला माहिती पाहिजे. मात्र, मुंबईची मुलगी त्यावेळी सी ग्रेड फिल्म करण्यात मग्न होती. आणि आता कमळाबाईची सुपारी वाजवते. हे महाराष्ट्र आणि मुंबईला पक्के कळाले असल्याची जहरी टीका घाडी यांनी केली.

तसंच कावळीणीच्या शापाने गाय मरत नसते, त्यामुळे माझ्या शापामुळे माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे शिवसेनेला कार्यकर्ता उरला नाही अशा फाजील वल्गना करून थेर महाराष्ट्राला दाखवू नका. शिवसेना ही कालही मजबूत होती आजही मजबूत आहे. कितीही शुर्पणखा अंगावर आल्या तरी त्यांची नाक कापून पुन्हा एकदा शिवसेना मुंबई आणि महाराष्ट्रावर आपला भगवा डौलाने फडकत ठेवणार असल्याचा विश्वास देखील घाडी यांनी व्यक्त केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com