ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर मेंदू योग्यरित्या कार्य करत असेल तर स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता आणि मनःस्थिती चांगली राहते. आणि भविष्यात डिमेंशिया आणि अल्झायमर होण्याचा धोका कमी होतो.
मेंदूला तीक्ष्ण आणि निरोगी ठेवण्यासाठी काही वाईट सवयी बदलणे गरजेचे आहे, या सवयी कोणत्या जाणून घ्या.
मेंदूच्या योग्य कार्यासाठी झोप महत्वाची आहे. झोपेच्या कमतरतेमुळे मेंदू थकतो आणि डिमेंशियाचा धोका वाढतो.
सिगारेटचा धूर मेंदूच्या पेशींचे नुकसान करते. त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण आणि सूज वाढते तसेच धुम्रपानमुळे विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमतेवर परिणाम होतो.
दारुचे सेवन केल्याने मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे स्मरणशक्ती आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
जास्त प्रमाणात बाहेरचे खाल्ल्याने किंवा शरीरात पोषणाचा अभाव असल्यास मेंदूची उर्जा कमी होते. यासाठी ताजे फळे, भाज्या आणि हेल्डी फॅट्सचे सेवन करा.
नवीन गोष्टी न शिकल्यामुळे मेंदू मंद होतो. म्हणून वेळोवेळी नवनवीन गोष्टी शिका.