Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

सर्वात मोठी बातमी; शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला, ठाकरे गटाला मोठा धक्का

शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळालं आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : राजकीय वर्तुळातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे.

शिंदे आणि ठाकरे गट या दोन्ही गटाची बाजू ऐकून निवडणूक आयोगाने हा निकाल राखून ठेवला होता.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत 40 आमदारांसह वेगळा गट निर्माण केली. शिंदे गटाने शिवेसना न सोडता पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा केला होता. आम्हीच शिवसेना पक्ष आहोत असं ते सातत्याने सांगत होते. त्यानंतर शिवसेना नेमकी कुणाची? याची लढाई निवडणूक आयोगासमोर सुरु होती.

आज निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मात्र उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना नाव यापुढे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे असेल. म्हणजेच शिवेसना शिंदे गटाची यावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विक्रोळी पुर्व द्रुतगती मार्गावर कन्नमवार हायवेवर कारचा आणि टेम्पोचा अपघात

मराठी लोकांना भंगार म्हणणाऱ्या परप्रांतीयाला दाखवली 'औकात', मनसेचा खळ्ळखट्ट्याक! वाद नेमका कशावरून झाला?

Maharashtra Politics : महायुतीमध्ये दरार पडणार? राज्यातील दोन बड्या नेत्यांमध्ये खडाजंगी

Manoj Jarange: मुंबईत धडकणाऱ्या मनोज जरांगेंना रोखण्यासाठी सरकारचा प्लॅन A आणि प्लॅन B काय?

Shocking News : डान्स शिकवण्याच्या बहाण्याने विश्वासात घेतलं, नंतर नराधम शिक्षकाने वासनेचं बळी बनवलं

SCROLL FOR NEXT