balasaheb thackeray and eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

'बाळासाहेब असते तर त्याना लाथ मारून बाहेर काढलं असतं'; सेना नेत्याची शिंदे गटावर जोरदार टीका

बाळासाहेब असते तर त्यांना लाथ मारून बाहेर काढलं असतं, अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर

Vinayak Raut News : शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा दोन दसरा मेळावा होणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाने दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी केली आहे. दोन्ही गटाने दसरा मेळाव्यासाठी भव्यदिव्य तयारी केली आहे. दसरा मेळावा सुरू होण्याआधीच शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

'बडगा आधी की कोडगा असा शिंदे गटाचा प्रकार आहे. बाळासाहेब असते तर त्यांना लाथ मारून बाहेर काढलं असतं, अशा शब्दात खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने गर्दी जमविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्ष मोठ्या संकटात आहे. शिवसेनेचे तब्बल ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केली आहे. त्याचबरोबर बंडखोर गटाचे नेतृत्व करणारे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर देखील दावा केला आहे.

त्यानुसार दोन्ही गटाने दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर काय टीका-टिपण्णी करणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. याआधीच सेना खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

विनायक राऊत म्हणाले, ' शिवसेनेचा एकमेवर दसरा मेळावा म्हणजे शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा आहे. शिवसेनेकडे कार्यकर्त्यांचे मॅनेजमेंट करतात. मात्र, शिंदे गट कंपन्या घेऊन कार्यक्रम मॅनेजमेंट करतात. बडगा आधी की कोडगा असा शिंदे गटाचा प्रकार आहे. बाळासाहेब असते तर त्यांना लाथ मारून बाहेर काढलं असतं. नकली ते नकली असतात. त्यामुळे तलवार सुद्धा नकली ठेवली आहे'.

'आमच्या पूर्वजांनी मुंबई १०६ हुतात्म्यांनी बलिदान करून मिळवली आहे. आमच्या मनात चिड आहे की, मुंबई ज्यांनी विकायला काढली आहे, हा डाव मोडून काढायचा आहे. गद्दारांच्या डोळ्यात अंजन घालणारे गाणं आज प्रसिद्ध होईल. अशीच अनेक गाणी येत आहेत, अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

SCROLL FOR NEXT