Sanjay Raut
Sanjay Raut Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut: विरोधकांकडून नामर्दपणे मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावर टीका, संजय राऊतांकडून विरोधकांवर टिकास्त्र

जयश्री मोरे

मुंबई: विरोधकांकडून नामर्दपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) आजारपणावर टीका केली जात आहे. विरोधकांच्या अंतरंगात किती कचरा आहे, हे देखील स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवर टीका करणारे नामर्द आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी विरोधकांनी टिकास्त्र सोडलं आहे (Shivsena MP Sanjay Raut Slams BJP For Criticizing CM Uddhav Thackeray).

वीर सावरकर भारतरत्नपासून उपेक्षित - संजय राऊत

"मुख्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमुळे राज्यात उत्साह आहे. विरोधकांना आता चपराक बसली आहे. सध्या उठसूट कोणालाही पद्म पुरस्कार दिले जातात. मरणोत्तर पुरस्कार थांबवायला हवेत. वीर सावरकरांना पुरस्कार द्याल असं वाटलं होतं. वीर सावरकर भारतरत्नपासून उपेक्षित आहेत", असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

"जिवंत असताना टीका करायची आणि नंतर पुरस्कार द्यायचा. गांधींनी एक ट्विट केलं नाही तर फडणवीसांना दुःख झालं. मग बाळासाहेबांना (Balasaheb Thackeray) पद्म विभूषण पुरस्कार (Padma Awards) का दिला नाही. फडणवीसांनी आधी त्यावर बोलावं मग आम्ही ट्विटवर बोलू. तुमचं सरकार असताना पुरस्कार द्यावासा का नाही वाटला", असा घणाघात संजय राऊतांनी केला.

निकाल काय द्यायचा जनता पाहिल - संजय राऊत

"चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) गोव्याचे प्रभारी कसे झाले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे चांगली मेहनत घेतात. दादा कुठे मधेच घुसले. आमच्या 40 पैकी 22 जागा येऊ द्या 24 जागा येऊ द्या. आमची काहीच हरकत नाही, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण, आम्ही आमच्या जागेवर निवडणूक लढू, निकाल काय द्यायचा जनता पाहिल", असा पलटवार संजय राऊतांनी केला.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

SCROLL FOR NEXT