Shivsena Mp Sanjay Raut on New Parliament Building Criticism of Modi Government Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut News: नवीन संसद भवन उपयुक्त नाही, त्यात गुदमरल्यासारखं होतं; संजय राऊत काय म्हणाले, वाचा...

Sanjay Raut Latest News: नव्या संसद भवानात गुदमरल्यासारखं होतंय. आतमध्ये हवा नाही, पाणी नाही एखाद्या बँकेट हॉलमध्ये आल्यासारखं वाटतं असंच चित्र आहे, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे

Satish Daud

Sanjay Raut on New Parliament Building

"नवीन संसद भवनामध्ये गोंधळाशिवाय काहीच नाही. सर्वांची इच्छा आहे की आम्हाला जुन्या संसद भवनात जाऊ द्या, नव्या संसद भवानात गुदमरल्यासारखं होतंय. आतमध्ये हवा नाही, पाणी नाही एखाद्या बँकेट हॉलमध्ये आल्यासारखं वाटतं असंच चित्र आहे", असं विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नेहमीप्रमाणे आज सकाळी मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी नव्या संसद भवनावर भाष्य केलं. एक ऐतिहासिक अशी वास्तू सोडून आपण फक्त कुणाच्या हट्टापायी २० हजार कोटी रुपये खर्च करुन एक नवीन वास्तू बांधली. ती उपयुक्त नाही, हा पैशांचा अपव्यय आहे, अशी टीका संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केली.

"नव्या संसद भवनात विशेष अधिवेशन घेऊन तुम्ही काय मिळवलं. विशेष अधिवेशन हे विशेष कारणासाठी घ्यायचं असतं. पण तसं न करता, फक्त काल तिथिनुसार प्रधानमंत्र्यांचा वाढदिवस होता. तो मुहुर्त साधून त्यांना महिला विधेयक आणायचं होतं, मंजूर करून घ्याययं होतं. तसेच भाजपच्या कार्यालयासमोर उत्सव साजरा करायचा होता. स्वत: वरती फुलं उधळून घ्यायची होती, म्हणून हे सगळं केलं का? अशा शंका लोकांच्या मनात आहेत", असंही संजय राऊत म्हणाले.  (Latest Marathi News)

दरम्यान, आमदार शिवसेना (Shivsena News) अपात्रतेसंदर्भात कारवाईला वेग आला असून गुरुवारी विधानसभा अध्यक्ष दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावर देखील संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेसंदर्भात काय निर्णय घ्यावा, यासाठी दिल्लीत यावं लागत असेल, तर आमच्या मनात ज्या शंका आहे त्याला बळ मिळतंय, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, गेले अनेक महिने हा घटनात्मक पेच विधानसभा अध्यक्षांनी वाढवून ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि निर्णय स्पष्ट असताना त्यांनी फक्त वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले. आता ८ दिवसामध्ये तुम्ही कारवाईला सुरुवात करा, असे स्पष्ट निर्देश असताना अजूनही त्यांचं वेळकाढूपणाचं धोरण संपलं नसेल, तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला मान दिला जात नाही हे स्पष्ट होतं, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimple Skin Care: हनुवटीवर सतत मुरूमं येतायेत? मग या ६ सवयी टाळा

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र|VIDEO

Raigad Politics: महायुती तुटली; रायगडमधील राजकारण फिरलं,भाजप-राष्ट्रवादीचा शिंदेंना दे धक्का

Maharashtra Live News Update: काँग्रेसने अकोला जिल्ह्यातील नगराध्यक्षपदाचे दोन उमेदवार केले जाहीर

BMC News : सिंगल-यूज प्लास्टिकवर १००% बंदी, नियम तोडणाऱ्यांवर कायमस्वरूपी कारवाई, मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT