Sanjay raut  saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut News : संजय राऊतांनी जामिनासाठी केला अर्ज; जाणून घ्या काय आहे प्रकरण ?

राऊत यांच्या जामीन अर्जावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टाकडून संजय राऊतांना दिलासा मिळणार का ? हे पाहावे लागणार आहे.

सूरज सावंत

Sanjay Raut News : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या (ED) अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात मंगळवारी अर्ज दाखल केला आहे. राऊत यांच्या अर्जावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टाकडून संजय राऊतांना दिलासा मिळणार का ? हे पाहावे लागणार आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी सोमवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयीन सुनावणीनंतर राऊतांची न्यायालयीन कोठडी आणखी वाढवण्यात आली असून त्यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे राऊतांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी जामीनासाठी अर्ज केला आहे.

राऊतांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात मंगळवारी अर्ज दाखल केला आहे. कोर्टाकडून संजय राऊत यांच्या अर्जावर यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे, राऊत यांच्या लीगल टीमने माहिती दिली आहे. संजय राऊत हे पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी सध्या आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत.

पत्राचाळ प्रकरण नेमकं आहे तरी काय ?

मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रवीण राऊतांची मे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांचे पत्राचाळ पुनर्विकासाचे म्हाडासोबत कंत्राट झाले. त्यांनी म्हाडा, भाडेकरूंसाठी फ्लॅट न बांधताच गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने ९ विकासकांना ९०१ कोटी रुपयांना एफएसआय विकला.

पत्राचाळीत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रवीण राऊत यांच्यावर आरोप आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळचे ३ हजार फ्लॅट बांधायचे होते. त्यापैकी ६७२ फ्लॅट भाडेकरूंना द्यायचे होते. तर उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घेण्यात येणार होते. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. फ्लॅट विकण्याच्या नावाखाली १३८ कोटी जमा केले. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT