Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde | …तोपर्यंतच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील; संजय राऊत नेमकं काय म्हणाले? वाचा...

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना भाजपला टोला लगावला.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या नाट्यमय घडामोडीचा गुरूवारी शेवट झाला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यापाठोपाठ राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर महाविकास आघाडीकडून आणि शिवसेनेकडून यावरून भाजपावर आणि एकनाथ शिंदेंवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक विधान केलं आहे. जोपर्यंत शिंदे स्वतः ला शिवसैनिक म्हणतील तोपर्यंत त्यांना मुख्यमंत्री पदावर बसवले जाईल. असं संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut latest News)

"जिथे ठाकरे तिथे शिवसेना आहे, एकनाथ यांना शुभेच्छा, मी जोपर्यंत फडणवीस यांच्याशी बोलत नाही तोपर्यंत ते नाराज आहेत असं बोलणार नाही. अडीच वर्षांपूर्वी जो शब्द दिला त्याचे पालन आता केलंय असं आम्हाला वाटत आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे काम ज्यांनी केलं त्यांना मोदी यांनी मुख्यमंत्री केलं. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

"जर हे वर्षांपूर्वी जर केल असतं तर हे झालं नसतं. या किंवा त्या कारणाने मुख्यमंत्री केले असं मी म्हणालो. शिवसेनाचा मुख्यमंत्री झाला असं नाही म्हणालो फ्लोर टेस्ट बद्दल मी बोलणार नाही. ते आमचे प्रतोत बोलतील किंवा सभापती बोलतील. जोपर्यंत ते स्वतः ला शिवसैनिक म्हणतील तोपर्यंत त्यांना मुख्यमंत्री पदावर बसवले जाईल" असा सूचक इशाराही राऊतांनी दिला. (Eknath Shinde News)

“फडणवीस शिंदेंचं राईट हँड”

दरम्यान, पुढे बोलताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस शिंदेंचे राईट हँड झाले आहे, असं संजय राऊत म्हणाले. “एकनाथ शिंदेंना अनुभव आहे. त्यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू झाला आहे. देवेंद्र फडणवीस आता त्यांचे राईट हँड मॅन आहेत. दोघांनी मिळून महाराष्ट्राचे प्रश्न मार्गी लावावेत. शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न त्यांनी मार्गी लावावेत. हे करत असताना प्रशासन, पोलीस दल नि:पक्षपातीपणे काम करतील याची काळजी घ्यावी”, असं ते म्हणाले. (Devendra Fadnavis Latest News)

“फडणवीसांना राज्य चालवण्याचा जास्त अनुभव आहे. त्यांनी पक्षाचा आदेश पाळून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं आहे. त्यामुळे दोघे एकमेकांचे राईट हँड आहेत”, असं देखील राऊत पुढे म्हणाले. दरम्यान, शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करायचं होतं, तर मग नारायण राणेंना मुख्यमंत्री का नाही केलं? . तेही शिवसैनिकच होते. असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणात खळबळ! महायुती-महाविकास आघाडीला धक्का, मुंडेंनी स्थापन केला नवा पक्ष|VIDEO

सख्खे भाऊ पक्के विरोधक! ऐन निवडणुकीत आमदाराच्या भावानं साथ सोडली, भाजपचं कमळ हाती घेणार

KDMC Election : एकनाथ शिंदेंचा मित्रपक्ष भाजपलाच जोरदार धक्का; डोंबिवलीत मोठी उलथापालथ

Maharashtra Live News Update : मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या, पुण्यातील मराठा सेवकांची मागणी

Rupali Thombare Photos: फ्रायरब्रँड नेत्या, रुपाली पाटील ठोंबरेंविषयी 'या' 6 गोष्टी माहित आहेत का?

SCROLL FOR NEXT