Sanjay Raut  Saam Tv
मुंबई/पुणे

महाविकास आघाडीचे ४ उमेदवार निवडून आणणे ही आमची जबाबदारी : संजय राऊत

निवडणुकीला सामोरे जाऊन महाविकास आघाडीचे (MVA) चार ही उमेदवार निवडून आणणे ही आमची जबाबदारी आहे , असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यसभा निवडणूक बिनविरोध करता आली असती. मात्र, भाजपने (BJP) राज्यसभेच्या निवडणुका राज्यावर लादल्या आहेत. त्यामुळे आता निवडणुकीला सामोरे जाऊन महाविकास आघाडीचे (MVA) चार ही उमेदवार निवडून आणणे ही आमची जबाबदारी आहे , असं वक्तव्य शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्यसभेच्या निवडणुकीवर भाष्य केलं आहे. (Sanjay Raut Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

आज राज्यसभा निवडणूकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे आता राज्यसभेच्या निवडणूक होणार हे अटळ आहे. शिवसेनेने त्यांचा दुसरा उमेदवार मागे न घेण्याची भूमिका घेतली. तर भाजपने देखील आपला तिसरा उमेदवरी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे या निवडणुका आता १० जून रोजी होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवेसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

राऊत म्हणाले, 'यावेळी उघड मतदान पद्धती असल्यामुळे पक्षातील आमदारांची मतं फुटणार नाहीत. या निवडणुका बिनविरोध करता आल्या असत्या. मात्र,भाजपकडून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे . तसेच आमदारांची जुळवाजुळव करायला लावायची. त्यामुळे सरकारचं अन्य कामांकडे दुर्लक्ष होईल'.

राऊत पुढे म्हणाले, 'महाविकास आघाडीचे प्रयत्न होते की घोडे बाजाराला वाव मिळू नये. सहमतीने ही निवडणूक व्हावी, त्यादृष्टीने महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ भाजपच्या नेत्यांना त्यांच्या घरी जाऊन भेटले. काही प्रस्तावांचे आदान प्रदान झाले. दोन्ही बाजूचे लोक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. 'त्यामुळं आता निवडणुकीला सामोरे जाऊन महाविकास आघाडीचे चार ही उमेदवार निवडून आणणे ही आमची जबाबदारी आहे. आमचा सहावा उमेदवार निवडून येईल. असा विश्वास देखील राऊतांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng Test : इंग्लंडला मोठा धक्का; बेन स्टोक्ससह हुकमी गोलंदाज ओव्हल कसोटीतून बाहेर, प्लेइंग ११ मध्ये ४ बदल

Maharashtra Live News Update: राष्ट्रीय समाज पक्षाची शुक्रवारी पुण्यात बैठक

Maharashtra Politics: राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत आमनेसामने; एकाच सोफ्यावर बसले पण नजरानजर टाळली|VIDEO

Nagpur Crime: धक्कादायक! जुन्या घरगुती वस्तूंची विकणाऱ्याला जबर मारहाण; पाकिस्तानी समजून डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक

Subodh Bhave- Mansi Naik Movie: सुबोध भावे आणि मानसी नाईक दिसणार एकत्र; 'सकाळ तर होऊ द्या' या दिवशी होणार रिलीज

SCROLL FOR NEXT