राज्यसभेची निवडणूक अटळ, भाजप तिसरी जागा लढणार: चंद्रकांत पाटील

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने तिसरी जागा बिनविरोधसाठी भाजपसमोर प्रस्ताव ठेवला होता.
Sharad Pawar, Devendra Fadnvis
Sharad Pawar, Devendra FadnvisSaam Tv

मुंबई: महाराष्ट्रासह देशभरातील राज्यसभेच्या (RajyaSabha) ५७ जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आज राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावर आता चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रीया दिली आहे. (Rajya Sabha Election 2022 News Updates)

Sharad Pawar, Devendra Fadnvis
विधान परिषदेच्या २ जागांवरुन आघाडीत मतभेद? शिवसेनेने तडजोड करावी; NCP, काँग्रेसची मागणी

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात, आज सकाळी आमची आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर चर्चा झाली. यात ही निवडणूक (Election) बिनविरोध कशी करता येईल यासाठी चर्चा झाली. पण सकाळी ११.३० नंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोणतीच चर्चा केली नाही. त्यामुळे आता भाजप राज्यसभेची ही निवडणूक लढणार हे अटळ आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Sharad Pawar, Devendra Fadnvis
मुंबई- पुणे महामार्गावर भीषण अपघात; २ जण जागीच ठार

आज आमची आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची तासभर चर्चा झाली. तिसरी जागा मागे घ्या असे ते म्हणत होते. भाजप तिसरी जागा १०० टक्के जिंकणार आहे. या निवडणुकीसाठी पुरेसे संख्याबळ त्यांच्याकडेही नाही, आणि आमच्याकडेही नाहीत. पण आमच्याकडे लागणारी १२ मते आहेत. इतर पक्षाच्या उमेदवारांशी आमचा संपर्क झालेला नाही. पण ब्रँडेड मते आम्हाला पडतील. आमचा माणसाच्या सद्सदविवेक बुद्धीवर विश्वास आहे, त्यामुळे आम्ही कोणत्याच आमदारांना हॉटेलवर ठेवणार नाही, असंही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

राज्यसभा बिनविरोध करण्याची परंपरा भाजपने तोडली - नाना पटोले

राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सकाळपासून सुरु होत्या. पण मात्र विरोधी पक्षांनी त्याला नकार दिला. त्यामुळे या निवडणुका होत आहेत. त्यावर मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे. राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची मात्र ही परंपरा भाजपने तोडल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला. भाजपला पैशाचा व केंद्र यंत्रणेत गर्व आहे. महाविकास आघाडीचे सर्व चारही उमेदवार निवडून येतील असा दावा नाना पटोले यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com