मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यसभा उमेदवारीच्या बदल्यात विधान परिषदेची एक जागा नेमकी कोणाची कमी होणार, यावरून मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Congress and NCP) विधान परिषदेच्या दोन जागा लढवण्यावर ठाम आहेत.
महाराष्ट्रासह देशभरातील राज्यसभेच्या (RajyaSabha) ५७ जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षाला आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. शिवाय आज राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना चांगला वेग आला आहे.
याच पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ भाजप नेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी भाजपने (BJP) सहाव्या जागेसाठी भरलेला धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत चर्चा झाली. मात्र, या भेटीचा काही उपयोग झाला नाही. कारण भाजप उमेदवार मागे न घेण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने राज्यसभा उमेदवारीचा पेच कायम राहीला आहे.
अशातच, राज्यसभेसाठी (RajyaSabha) महाविकास आघाडीने दिलेला चौथा उमेदवार मागे घेतला, तर भाजप (BJP) विधान परिषदेसाठी चार उमेदवार देणार असल्याची भूमिका भाजपने घेतल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय आजची फडणवीसांसोबतची बैठत असफल झाल्याने, आधीच अडचणीत सापडलेल्या महाविकास आघाडीची आता चांगलीच कोंडी झाली आहे.
दरम्यान, या सगळ्या घडामोडीत महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यसभा उमेदवारीच्या बदल्यात विधान परिषदेची एक जागा कोण कमी कराणार यावरून मतभेद असल्याची माहिती समोर आला आहे. शिवाय शिवसेनेला राज्यसभेच्या २ जागा लढवायच्या असतील तर, विधान परिषदेची एक जागा कमी लढवावी, अशी भूमिका काँग्रेस, राष्ट्रवादीने घेतल्याचं समजतं आहे. त्यानुसार राज्यसभेच्या जागेसाठी शिवसेना विधान परिषदेची एक जागा कमी लढवणार का? याकडे सर्वांच लक्ष लागून राहीलं आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.