राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार? चंद्रकांत पाटील म्हणतात...

महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली आहे.
chandrakant patil
chandrakant patilSaam Tv
Published On

सुशांत सावंत

मुंबई - महाराष्ट्रातून राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत. काल महाविकास आघाडीच्या नेत्याचा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटण्याचा निरोप आला. दरम्यान, आज महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी माहिती दिली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्य सभेची निवडणूक 10 तारखेला होणार आहे. भाजपसाठी राज्यसभा महत्त्वाची आहे त्यामुळे महाविकास आघाडीने ही तिसरी जागा भाजपसाठी सोडावी. त्यांनी जर आमचा प्रस्ताव मान्य केला नाही तर ही निवडणूक होणारच. आम्ही तिसरी जागा लढणं आणि जिंकणं यावर ठाम आहोत. तुम्हीच आम्हाला राज्यसभेला पाठिंबा द्या. आम्ही तुम्हाला विधान परिषदेत पाठिंबा देऊ, असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

हे देखील पाहा -

एकाच पक्षाचे 24 अधिक सहयोगींचे 6 अशी मते आमच्याकडे अतिरिक्त आहेत. विजयासाठी 41 मतांचा कोटा आहे. आम्हाला फक्त 11 ते 12 मते कमी पडत आहेत. आघाडीच्या मतांचा आकडा 30च्या पुढे जात नाही. आम्ही तिसरी जागा लढणं आणि जिंकणं यावर ठाम आहोत. आज खूप चांगली चर्चा झाली पण आम्हाला आमच्या पक्षाची काळजी आहे. पार्टीचा उमेदवार मागे घेणं हे शक्य नाही. आम्ही आमच्या श्रेष्ठीच्या कानावर घातले आहे ते म्हणाले तुमची भूमिका योग्य आहे. त्यांनी जर त्यांचा उमेदवार मागे घेतला नाही तर आम्ही लढू. जर त्यांनी आता सहकार्य केलं तर आम्ही विधान परिषदेत करू असे देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

chandrakant patil
गोपीनाथ मुंडेंची 'ती' आठवण सांगताना धनंजय मुंडे गहिवरले, समाधीस्थळी झाले नतमस्तक

आम्ही विधान परिषदेला पाचवी जागा लढणार नाही. राज्यसभेची जागा मागे घ्या, असं आम्ही आघाडीच्या नेत्यांना स्पष्ट केलं. तिसरी जागा लढणं आणि तिसरी जागा जिंकण्यात आम्ही खूप कॉन्फिडन्ट आहोत. त्यांनी प्रस्ताव मान्य केला नाही तरी ही निवडणूक होणार आणि आम्ही निवडणूक जिंकणारच, असं पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com