गोपीनाथ मुंडेंची 'ती' आठवण सांगताना धनंजय मुंडे गहिवरले, समाधीस्थळी झाले नतमस्तक

यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना अनेक आठवणींना उजाळा दिला आहे .
Dhananjay Munde News, Beed Latest Marathi News
Dhananjay Munde News, Beed Latest Marathi NewsSaam Tv

बीड - दिवंगत गोपीनाथराव मुंडेंचा आज 8 वा पुण्यस्मरणदिन आहे. याचं पार्श्‍वभूमीवर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. (Dhananjay Munde News)

यावेळी ते म्हणाले, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ज्या पट्टीवडगाव गटातून निवडणुकीसाठी उभे राहिले होते. त्याच पट्टीवडगाव गटातून मला निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आग्रह केला. पट्टीवडगाव जिल्हापरिषद निवडणुकीत उभं करण्यासाठी माझ्या वडिलांचा निवडणुकीस विरोध असतानाही, त्यांनी मला उभं केलं, आणि मी निवडून आलो. ही माझ्यासाठी त्याची न विसारणारी आठवण आहे असं म्हणत धनंजय मुंडे भावुक होऊन माध्यमांशी बोलले.

हे देखील पाहा -

तसेच, धनंजय मुंडे यांनी ट्विट करीत गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली आहे. ते म्हणाले की, अजूनही आठवतो तो 3 जूनचा काळा दिवस. आजही असं वाटतं अप्पा, तो दिवस उजाडलाच नसता तर. अप्पा तुम्ही नाहीत, पण तुमची चेतना आजही आमच्यात आहे, तुमचा आवाज आजही कानात घुमतो! भावपूर्ण आदरांजली अप्पा अशा शब्दात धनंजय मुंडेंनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौव्हाण यांच्यासह मंत्री भागवत कराड, खासदार सुजय विखे, माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासह राज्यासह परराज्यातील अनेक भाजपचे मोठे नेते मंडळी गोपीनाथ गडावर उपस्थिती लावणार आहेत. याच पार्श्वभूमीवर गोपीनाथ गड परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून डॉग्स स्कॉड मार्फत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळासह परिसराची तपासणी केली जात आहे.

Dhananjay Munde News, Beed Latest Marathi News
बाबो! नेत्याला विधानपरिषदेसाठी संधी मिळावी म्हणून कार्यकर्त्याने लिहिलं रक्ताने पत्र

दरम्यान या कार्यक्रमासाठी 200 पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून कोणताही घातपात होऊ नये, यासाठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आल्याचं पोलीस उपाधीक्षक सुनील जायभाये यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com