Sangli News
Sangli NewsSaam Tv

बाबो! नेत्याला विधानपरिषदेसाठी संधी मिळावी म्हणून कार्यकर्त्याने लिहिलं रक्ताने पत्र

नेत्यासाठी कार्यकर्ते काही पण याचाच प्रत्यय सांगलीत आला आहे.
Published on

सांगली - नेत्यासाठी कार्यकर्ते काही पण याचाच प्रत्यय सांगलीत आला आहे. सांगलीच्या इस्लामपूर मधील अशाच एका कार्यकर्त्यांने आपल्या नेत्यासाठी काय पण असे म्हणत त्यांना विधानपरिषद सदस्यासाठी संधी मिळावी म्हणून पक्षातील वरिष्ठ नेत्यांना रक्ताने पत्र लिहिले आहे. इस्लामपूरचे (Islampur) नगराध्यक्ष आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासाठी आष्टा येथील प्रवीण माने या कार्यकर्त्याने हे पत्र लिहिले आहे. प्रवीण हे भाजपचे कार्यकर्ते आणि भाजप (BJP) युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष असून त्यानी निशिकांत पाटील यांना विधानपरिषद सदस्यासाठी संधी मिळावी अशा आशयाचे पत्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना पाठवले आहे.

हे देखील पाहा -

भाजपचा विचार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या नेतृत्वाखाली झालेला विकास व भविष्यातील देश हिताचे धोरण इस्लामपूर विधानसभा मतदारसंघासह सांगली जिल्ह्यातील प्रत्येक घटकांपर्यत पोहोचवण्यासाठी निशिकांत पाटील यांच्यासह भाजपाचे सर्व कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. आपला शब्द प्रमाण म्हणून निशिकांत पाटील यांची वाटचाल सुरु आहे. निशिकांत पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी इस्लामपूर विधानसभा निवडणूकही लढवली आहे. तसेच त्यांना राजकीय तसेच सामाजिक कार्य करीत असताना विरोधी गटाकडून अनेक अडचणींचा सामना करावा लागला. भाजपचा प्रचार आणि प्रसार त्यांनी कायम सुरुच ठेवला आहे. अशा कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्वाला विधानपरिषदेवर काम करण्याची संधी मिळाली तर खऱ्या अर्थाने या मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्याचा सन्मान होईल असे लिहिले आहे.

Sangli News
शिवलिंग शोधण्यापेक्षा काश्मिरी पंडितांकडे लक्ष द्या; राऊतांचा भाजपवर हल्ला

पुढे त्यांनी पात्रात लिहिले आहे की, सध्या सुरु असलेला राजकीय संस्थांत्मक व कार्यकर्त्याचा संघर्ष या निवडीमुळे संपून जाईल आणि भविष्यात या मतदारसंघातून विधानसभेमध्ये भाजपाचा आमदार पोहोचवण्यासाठी बळ मिळेल. तरी कृपया आपण आमच्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आपला आशीर्वाद निशिकांत पाटील यांच्यासह माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांवर आहे, तो यापुढेही राहिल. तरी आपणांस पुनश्च विनंती निशिकांत पाटील यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी ही नम्र विनंती या पत्राद्वारे प्रवीण माने या कार्यकर्त्यांने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com