Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut: महाराष्ट्रात पुन्हा सत्ता परिवर्तन? संजय राऊतांचे सूचक वक्तव्य

शिंदे गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात सत्तांतर होऊन तब्बल २६ दिवस झाले. शिंद-फडणवीस सरकारचा अजुनही विस्तार झालेला नाही. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावरुन आता संजय राऊत यांनी टोला लगावत सूचक वक्तव्य केले. 'महाराष्ट्रात पुन्हा सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका, असं सूचक वक्तव्य आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. शिंदे गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले. (Sanjay Raut Latest News)

संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांना एका महिन्यात पाचवेळा दिल्लीत यावे लागते. राज्यात पूरपरिस्थीती आहे. फक्त दोघांचेच कॅबिनेट सुरु आहे. या गटाने आता महाराष्ट्राला काय दिले. कोणत्याही परिस्थितीत सर्वाच्च न्यायालयामध्ये संविधानाच्या विरोधात निकाल देणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे, असा विश्वासही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला.

शिंदे गटातील आमदारांना दुसऱ्या पक्षात विलिन होण्याशिवाय पर्याय नाही. आमदार आमच्या संपर्कात आहे, त्यामुळे राज्यात पुन्हा सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नये, असं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. (Shiv Sena Latest News)

हे देखील पाहा

शिंदे गटातील आमदारांना दुसऱ्या पक्षात विलिन व्हायला लागणार आहे. मग हे स्वत:ला शिवसैनिक कसे म्हणतील, यातील अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. शिवसेना येणाऱ्या सर्व निवडणुका लढेल. भाजपला शिवसेना फोडायची होती. ती त्यांनी फोडायचा प्रयत्न केला आहे. भाजपचे हे यश दिर्घकाळ टीकणार नाही, असंही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sillod News : सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

IND vs SA: भारत- दक्षिण आफ्रिका सामन्याची वेळ बदलली? रात्री किती वाजता सुरु होणार सामना?

BKC Metro Fire: बीकेसी मेट्रो स्टेशनला आग; आगीमुळे सर्व मेट्रो थांबवल्या

Breakfast Dishes : तुमच्या लहानग्यांसाठी हेल्दी अन् टेस्टी नाश्ता, मुलं बोट चाटत राहतील

SCROLL FOR NEXT