...त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला असावा; अजित पवारांची शिंदे सरकारवर टीका

मुख्यमंत्री दिल्लीत जाणार आहेत. मात्र, ज्यांना त्यांना भेटायचे होते, कदाचित ते उपलब्ध नव्हते.
Ajit Pawar Eknath Shinde
Ajit Pawar Eknath ShindeSaam TV
Published On

नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आज दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलत असताना राज्य सरकारवर निशाणा साधला. तसंच पुरग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, 'मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये, दोघे म्हणतात आम्ही दोघे काम करतो आहे. मात्र, हे शक्य नाही. प्रत्येक फाईल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडे जाणार असेल तर ते शक्य नाही. त्यांना एवढं मोठं बहुमत मिळालं आहे. त्यांनी ते विधानसभेतही दाखविले आहे. मग मंत्रिमडळ विस्तार का करत नाहीत असा सवालही पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

Ajit Pawar Eknath Shinde
Nandurbar: माल वाहतूक रेल्वेच्या धडकेत एक ठार

तसंच आजही मी काही मुद्द्यांबद्दल मुख्यमंत्र्यांना (Eknath Shinde) भेटलो. त्यांना विचारलं मंत्रिमंडळ विस्तार का करत नाही. ते म्हणाले आम्ही करतो. मात्र, ते विस्तार करतो असं म्हणत असले तरी ते होत नाही. हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. कदाचित त्यांना दिल्लीतून परवानगी मिळत नसावी, की इतर काही समस्या आहे, हे माहीत नाही असंही पवार यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, शिवाय माझी अशी एकीव माहिती होती की, आज दिल्लीत जाणार आहे. मात्र ज्यांना त्यांना भेटायचे होते, कदाचित ते उपलब्ध नव्हते. अखेर दिल्लीतील श्रेष्ठींना संपूर्ण देशाचा कारभार पहायचं असतो. त्यामुळे आम्ही टीका करण्याचे कारण नाही असा टोलाही त्यांनी लगावला. तसंच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकीकडे मुलाखत द्यायची आणि त्याला मग उत्तरे दिली जातात. यातून राज्याचे प्रश्न सुटणार नाही ही वस्तुस्थिती आहे.

पाहा व्हिडीओ -

सत्ता बदल होता ना मोठ्या प्रमाणावर आश्वासन देण्यात आली त्याची पूर्तता कठीण होत आहे. म्हणून मंत्रिमंडळ विस्तार होत नाही का? असे ऐकले आहे. भाजपकडे (BJP) 115 आमदार आहेत भाजप कार्यकारणी मधील रोख लक्षात घेतला तर आमदारांनी त्यागाची भावना ठेवा असे सांगण्यात आले. तिकडे शिंदे गटातूनही कोण मंत्री होणार कोण राज्यमंत्री होणार असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे विस्तार होत नसावे असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com