Uddhav Tahckeray Saam TV
मुंबई/पुणे

"शिवसेनेचा सातबारा राष्ट्रवादीच्या नावावर केला की काय? बाळासाहेबांच्या भूमिकेचा विसर"

''गरज सरो वैद्य मरो' अशी भूमिका संजय राऊत यांची आहे. आधी सोनिया गांधी यांची गरज होती त्यावेळी पायघड्या घातल्या'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुबंई : जाणीव पूर्वक कारवाई अशी ठरलेली वक्तव्य येत असतात आपल्या पर्यंत कारवाईची धग लागते म्हणून या कारवाई आहेत अशी दुटप्पी भूमिका या ठिकाणी काँग्रेस (Congress) घेत असल्याचं वक्तव्य भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. नाना पटोले यांचे वकील अॅड. सतीश उके (Satish Uke) यांच्या घरी ED च्या पथकाने छापा मारला आहे त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेने या कारवाईवर भाजपवर टीका केली आहे. त्याबाबत दरेकर यांनी वरील वक्तव्य केलं.

शरद पवारांना UPA च्या अध्यक्षपदाच्या ठरावाबाबत आणि त्यानंतर संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलेल्या वक्तव्याबाबत दरेकरांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'गरज सरो वैद्य मरो' अशी भूमिका संजय राऊत यांची आहे. आधी सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांची गरज होती त्यावेळी पायघड्या घातल्या आता शिवसेनेने आत्मपरीक्षण करावे शिवसेनेचा (Shivsena) सातबारा राष्ट्रवादीच्या नावावर केला की काय अशी बोचरी टीकाही दरेकर यांनी सेनेवर केली.

तसंच पालिकेच्या घोटाळ्याची लक्तरे मांडली आम्ही मांडली म्हणून ही कारवाई सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर देखील तुम्ही कठोर पणे वागत आहात ही हुकूमशाही आहे. सरकारने समन्वयातून मार्ग काढावा असा सल्ला देत कर्मचारी सरकारचे ऐकणार नाही असही ते म्हणाले. संजय राऊत यांना तुसडे पणाने बोलल्याशिवाय काही येत नाही. बाळासाहेबांची भूमिका आठवा ना? पवार साहेबांसोबत गेल्याने बाळासाहेबांच्या भूमिका विसरत आहात असही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT