"मी स्वयंभु आहे, मी कोणाच्या कुबड्या घेऊन आलो नाही"- माजी आमदार सुभाष भोईर प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

"मी स्वयंभु आहे, मी कोणाच्या कुबड्या घेऊन आलो नाही"- माजी आमदार सुभाष भोईर

"मी स्वयंभु आहे, मी कोणाच्या कुबड्या घेऊन आलो नाही" असं म्हणत शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

प्रदीप भणगे

कल्याण: कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर हे विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या कार्यक्रमात दिसेनासे झाले आहेत. ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा कल्याण-डोंबिवली (Kalyan - Dombivali) मध्ये सुरू आहे. यावर सुभाष भोईर (Ex. MLA Subhash Bhoir) यांना विचारलं असता मी स्वयंभू आहे. मी कुणाच्या कुबड्या घेऊन आलो नाही. पक्षाने बोलावलं तर जाणार, नाही बोलावलं तर जायचं कशाला अश्या शब्दात भोईर यांनी पक्षातील सहकाऱ्यांना टोला लगावला आहे. (shivsena ex mla subhash bhoir slams his own party)

हे देखील पहा -

कल्याण ग्रामीण भागातील पिसवली गावातील तलावाच्या कामासाठी मा. आमदार सुभाष भोईर यांनी आमदार निधी मधून दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तर फिफ्टी फिफ्टी हॉटेल रोडवरील मागील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पावसाळ्यात नागरिकांची हेळसांड होत होती. त्यामुळे सुभाष भोईर यांनी तब्बल १५ लाखांचा निधी हा मंजूर करून दिला आहे. शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार सुभाष भोईर यांनी भाजपचे (BJP) मा. उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या प्रभागात निधी उपलब्ध करून दिला असल्यांने सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. यावेळी माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर, विश्वास भोईर, श्रीपत भोईर, भरत जाधव, रणजित उघाडे, विशाल भाने भाजपचे पदाधिकारी आणि पिसवली ग्रामस्थ उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oscar 2026: करण जोहरच्या 'होमबाउंड'चा ऑस्कर २०२६ मध्ये दबदबा; टॉप १५ चित्रपटांच्या यादीत एन्ट्री

Railway Update: वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा, आता तिकीट स्टेटस 10 तास आधीच पाहता येणार; रेल्वेने नियम बदलले

ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; प्रज्ञा सातव यांच्यानंतर आणखी एक नेता साथ सोडणार

वांगणीत रेल्वे प्रशासनाची 'अशी ही बनवाबनवी'; वनविभागाची परवानगी न घेता भूयारी मार्गाचं काम, चूक लक्षात येताच जागा बदलली

Maharashtra Politics: पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांनी खेळला डाव, भाजपसह ठाकरे गटाला 'दे धक्का, ८ जणांनी हाती बांधलं घड्याळ

SCROLL FOR NEXT