Shiv Sena vs BJP: भाजप नेते आशिष शेलारांविरोधात शिवसेनेची आक्रमक बॅनरबाजी वैदेही काणेकर
मुंबई/पुणे

कसं काय शेलार बरं हाय का ? शेलारांविरोधात शिवसेनेची आक्रमक बॅनरबाजी

बॅनरवर आशिष शेलार यांना तमाशातील नाच्याच्या भूमीकेत दाखवण्यात आलं आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बद्दल अवमान करणारं आक्षेपार्ह वक्तव्य भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केलं होतं. त्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद सध्या सुरू आहे. त्यातच आता शिवसेनेनं आक्रमकपणे आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारं बॅनर थेट मुंबईत नरीमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालया समोरच लावलं आहे . या बॅनरवर आशिष शेलार यांना तमाशातील नाच्याच्या भूमीकेत दाखवण्यात आलं आहे. त्याखाली आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारी टिकाही करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

अशा प्रकारे उडवली खिल्ली

'कसं काय शेलार बरं हाय का ?

काल काय एैकलं ते खरं हाय का ?

काल म्हणं तूम्ही, किशोरी ताईंचा अपमान केला,

तमाशातल्या नाच्या सारखा शिमगा केला ?

दरम्यान, किशोरी पेडणेकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आशिष शेलार यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्वत: किशोरी पेडणेकर यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी आशिष शेलार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT