राजकीय पक्षाने मत मागण्यासाठी येऊ नये, घरासमोर लावल्या अनोख्या पाट्या
राजकीय पक्षाने मत मागण्यासाठी येऊ नये, घरासमोर लावल्या अनोख्या पाट्याSaam Tv

राजकीय पक्षाने मत मागण्यासाठी येऊ नये, घरासमोर लावल्या अनोख्या पाट्या

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने निवडणुकीत मतदान न करण्याचा नागरिकांचा निर्णय.
Published on

बुलढाणा - राज्यात १०५ नगरपंचायतीच्या निवडणुकांची धामधूम सुरु आहे. बुलढाणा जिल्ह्यातही दोन नगरपंचायतीचा यात समावेश आहे. अशातच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा राज्य सरकारचा अध्यादेश स्थगित केला आहे. यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका सुरू ठेवण्याच्या निर्णय झाल्याने बुलढाण्यातील संग्रामपूर येथील ओबीसी वर्ग व्यथित होऊन नगर पंचायत निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय गावातील ओबीसी बांधवानी घेतला आहे.

हे देखील पहा -

या नगर पंचायतीत १७ जागा होत्या पण आता ओबीसींच्या ४ जागा स्थगित झाल्याने या गावात अनेक ओबीसींच्या घरासमोर, दरवाज्यावर या घरात कोणत्याही राजकीय पक्षाने मत मागायला येऊ नये...! जो पर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तो पर्यंत आम्ही मतदान करणार नाही असे पाट्या लावण्यात आल्या आहेत. यामुळे मात्र राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. राज्यात अशाप्रकारे ओबीसींनी विरोध केल्याचे पहिल्यांदाच दिसत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com