shivsena 16 mla disqualification case Eknath Shinde group claim Shiv Sena belongs to us uddhav thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Shiv sena Crisis: ठाकरे गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी, १६ आमदार अपात्र प्रकरणात शिंदे गटाचा मोठा दावा

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: 16 आमदार अपात्र प्रकरणात शिंदे गटातील आमदारांनी आपले उत्तर सादर केले असून यामध्ये मोठा दावा केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: शिवसेनेतील फुटीनंतर १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपावण्यात आलं आहे. राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, विधानभा अध्यक्षांनी दोन्ही गटातील आमदारांना (शिंदे आणि ठाकरे) नोटीस पाठवून लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते. आता शिंदे गटातील आमदारांनी आपले उत्तर सादर केले असून यामध्ये मोठा दावा केला आहे. (Latest Marathi News)

शिंदे गटाच्या ३९ आमदारांकडून ६ पानांचे प्रतिज्ञापत्र देण्यात आल्याची माहिती आहे. इतक्या लांबलचक प्रतिज्ञापत्रांवर विधानसा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात आणि यासाठी किती कालावधी लागेल, याबाबत अनेकांना उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, शिंदे गटाने (Eknath Shinde) आपल्या प्रतिज्ञापत्रात आमचीच शिवसेना हा मूळ पक्ष आहे आणि पक्षात फूट नाही, असा दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाची प्रत देखील शिंदे गटाने या प्रतिज्ञापत्रांमध्ये जोडली असल्याची माहिती आहे. आमचीच शिवसेना खरी शिवसेना आहे, असा वारंवार दावा शिंदे गट करत असल्याने ठाकरे गट (Uddhav Thackeray) आता नेमकं काय भूमिका घेणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे गट मुद्दाहून वेळकाढूपणा करत असल्याचा दावा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना नोटीसची वेळ संपली असून कारवाई कधी होणार असा प्रश्न विचारला. यावर राहुल नार्वेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “आमदारांच्या अपात्रता प्रकरणात उचित कारवाई सुरू आहे, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

आमदारांना सुनावणीसाठी कधी बोलावलं जाईल यावरही राहुल नार्वेकरांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली. “लवकरच सुनावणी चालू करण्यात येईल. इतर प्रक्रिया सुरू आहेत. मी आश्वासित करतो की, यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही. तसेच नियमांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल,” अशी माहिती राहुल नार्वेकरांनी दिली.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Horoscope: 'या' राशींवर देवी लक्ष्मी होणार प्रसन्न, पैशाची चणचण भासणारच नाही; वाचा तुमचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: विधानसभेसाठी मनोज जरांगेंचा फुलप्रुफ प्लॅन, मविआला बसणार फटका? वाचा स्पेशल रिपोर्ट

Sharad Pawar: निवडणूक आयोगाचा शरद पवार गटाला मोठा दिलासा; Trumpet च्या चिन्हाचं भाषांत्तर 'ट्रम्पेट' च

Prakash Ambedkar: निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रकाश आंबेडकरांची प्रकृती खालवली; रक्तात आढळली गाठ

Adulterated Sweets: ऐन सणासुदीत भेसळीचा काळाबाजार; बाजारात विकला जातोय नकली खवा?

SCROLL FOR NEXT