Pune Shivaji Nagar Bus Stand : शिवाजीनगर आणि स्वारगेट एसटी बसस्थानक विकसीत करण्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा आणि १ मे २०२५ रोजी प्रकल्पाचे भूमीपूजन करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते सांमजस्य करार तातडीने पूर्ण करावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी शिवाजीनगर बसस्थानक विकासासाबाबत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन वेळोवेळी पाठपुरवठा केला. तर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नुकताच परिवहन राज्यंमत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर शिवाजीनगर आणि स्वारगेट बसस्थानकाचा मुद्यावर मुंबई काल झालेल्या आढावा बैठकीत चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे अधिकारी उपस्थितीत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवजीनगर बस स्थानकासाठी ४५० कोटी रूपयांचे बजेट अशेल. महाराष्ट्र दिनी या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. १६ मजली इमारत बांधली जाणार आहे. त्यामध्ये सर्व सोयी सुविधा असतील, असे सांगण्यात ेत आहे.
प्रकल्पाची महत्त्वाची वैशिष्ट्ये:
आधुनिक बसस्थानकासोबत व्यावसायिक संकुलाची उभारणी.
वाहनतळासाठी दोन तळघर.
किरकोळ विक्रीसाठी सेमी-बेसमेंट.
बसस्थानक तळमजल्यावर, बसआगार पहिल्या मजल्यावर आणि बसवाहनतळ दुसऱ्या मजल्यावर.
शासकीय व खाजगी कार्यालयांसाठी 16 मजली इमारत.
शिवाजीनगर बसस्थानकाची पुनर्बांधणी पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, ती वेळेत आणि दर्जेदार पध्दतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्त्वावर राबविण्यात येणारा हा प्रकल्प दर्जेदार होण्याबरोबरच वेळेत व प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी ‘महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समन्वयाने काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. तसेच ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्त्वाच्या प्रकल्पांसाठी चांगले विकसक मिळण्यासाठी 99 वर्षाचा करार करण्याचा प्रस्ताव तातडीने मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शिवाजीनगर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचा घेतलेला निर्णय पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी ‘महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समन्वयाने काम करावे. हा प्रकल्प निर्धारीत कालावधीत पूर्ण करण्यासाठी येत्या महाराष्ट्र दिनी (दि. 1 मे 2025) या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्याच्यादृष्टीने आवश्यक ते सांमजस्य करार तातडीने पूर्ण करावेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुणेकरांना जलद आणि सुयोग्य सुविधा लवकरच मिळणार आहेत. शिवाजीनगर बसस्थानकाच्या जागेवरील चटई क्षेत्राचा उपयोग करून प्रकल्पाची आर्थिक गुंतवणूक सुलभ करण्यासाठी तो ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ या तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पात ‘महामेट्रो’ प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणा म्हणून काम करणार आहे. त्यासाठी ‘महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यात नवा सामंजस्य करार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्वारगेट येथे अत्याधुनिक बसस्थानक उभारणीसाठी आवश्यक त्या कार्यवाही पूर्ण कराव्यात. शिवाजीनगर बसस्थानकासह स्वारगेट बसस्थानकाच्या विकासाचा प्रकल्पसुध्दा पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, तो वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.