Nilesh Ghare Arrest  Saam tv
मुंबई/पुणे

Nilesh Ghare Arrest : शस्त्र परवान्यासाठी नको त्या थराला गेला; पोलिसांनी निलेश घारेच्या मुसक्या आवळल्या

Nilesh Ghare Arrest in pune : पोलिसांनी निलेश घारेला अटक केली आहे. शस्त्र परवान्यासाठी नको स्वत:च्या गाडीवर गोळीबाराचा बनाव रचलेल्या निलेश घारेला पोलिसांनी अटक केली आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी हाती आली आहे. शिवसेना युवासेना अध्यक्ष निलेश घारे याला अटक केली आहे. पुण्यातील वारजे पोलिसांनी घारेला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी निलेश घारे याने स्वतःच्या गाडीवर गोळीबाराचा बनाव केला होता. तसेच शस्त्र परवाना मिळावा आणि पोलिस अंगरक्षक मिळावा म्हणून त्याने गोळीबाराचा बनाव रचला होता. यासाठी त्याने वारजेमध्ये ४ जणांना स्वत:च्या गाडीवर गोळीबार करायला सांगितलं होतं.

पुण्यातील वारजे माळवाडी भागात घारे याच्या कारवर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. घारेच्या कारवर १९ मे रोजी गोळीबार झाला होता. या गोळीबारानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलीस तपासात निलेश राजेंद्र घारे याने गोळीबाराचा बनाव रचल्याचा उघडकीस आलं. त्यानंतर पोलिसांनी आज बुधवारी निलेश घारेच्या मुसक्या आवळल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्याच्या शिवसेनेच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे याच्यावर १९ मे रोजी रात्री १२ वाजता वारजे भागात त्याच्या वाहनावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार केल्याची माहिती वारजे पोलिसांना मिळाली होती. दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी घारे याच्या वाहनावर रात्री 12 वाजता गोळीबार केला होता. सुदैवाने यात कोणीही जखमी झाला नव्हतं.

वारजे पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथकं या प्रकरणाचा तपास करत होते. घारे याने याआधी वारजे पोलिस ठाण्यात शस्त्र परवाना मिळावा यासाठी अर्ज केला होता. मात्र तो रद्द करण्यात आला होता. शस्त्र परवाना मिळावा आणि जिल्हाध्यक्ष असल्याने पोलीस संरक्षण मिळावे यासाठी त्यानेच हा गोळीबार घडवून आणला होता. या प्रकरणी वारजे पोलिसांनी सचिन गोळे, शुभम खेमणार आणि अजय उर्फ बगली सकपाळ यांना अटक केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon: महाराष्ट्र हादरला! ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, आई घरात नसताना नातेवाईकाचं भयंकर कृत्य

Grow coriander at home: घरच्या कुंडीत नीट कोथिंबर उगवत नाहीये? या सोप्या टीप्सचा करा वापर

Lpg Gas cylinder Colour: सर्व गॅस सिलेंडर हे लाल रंगाचेच का असतात?

मोठी बातमी! निधी वाटपात मुंबई महापालिका अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार?

Suryakumar-Devisha Love story : देविशाला डान्स करताना पाहिलं अन् सूर्याची विकेट पडली; विश्वविजेत्या कर्णधाराची हटके लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT