Uddhav Thackeray On India Aghadi PM Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : एक्झिट पोल गुवाहाटीत कापलेल्या रेड्यांसारखा, ४ जूनला INDIA आघाडीच जिंकणार; ठाकरे गटाला विश्वास

Satish Daud

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सातही टप्पे पार पडले. आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे. मात्र, निवडणुकीच्या निकालाआधीच एक्झिट पोलने आकडेवारी सादर केली आहे. देशात पुन्हा एकदा भाजप प्रणित एनडीएला बहुमत मिळेल, असा अंदाज आकडेवारीत मांडण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामना अग्रलेखातून एक्झिट पोलच्या आकडेवारीवर टीका करण्यात आली आहे.

एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेडय़ांसारखा आहे. त्यामुळे खरा निकाल बदलणार नाही, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे. मोदी है तो इंडिया आघाडीचा विजय शंभर टक्के मुमकीन है! मोदी जात आहेत हाच 4 जूनचा खरा निकाल आहे, असा विश्वासही सामनातून व्यक्त करण्यात आला आहे.

"4 जूनला मतमोजणी होईल व हुकूमशाहीचा अंधकार दूर होईल. मोदींनी ध्यान केले व सूर्याला शांत केले असे भाजपवाले सांगतात. मोदी यांनी ध्यान केले तरी जनतेच्या मनात उसळलेला उद्रेक ते शांत करू शकलेले नाहीत व त्यामुळे भाजपचा पराभव होणारच आहे", असं सामना अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.

"भाजप 225 जागांच्या पुढे जात नाही, इंडिया आघाडी 295 ते 310 जागा जिंकून सरकार स्थापन करेल. यावेळी एक्झिट पोलचे आकडे व 4 जूनचे प्रत्यक्ष निकाल यात जमीन अस्मानाचा फरक राहील याविषयी आमच्या मनात तरी शंका नाही. एक्झिट पोलच्या माध्यमातून शेअर बाजारात उलथापालथ घडवायची व जाता जाता मोठा हात मारून जायचे", अशी टीकाही सामना अग्रलेखातून करण्यात आली.

"एक्झिट पोल हा सर्व आकडय़ांचा बनावट खेळ आहे. देशातल्या जनतेचा मूड आणि हे एक्झिट पोल अजिबात मेळ खात नाहीत. ज्या प्रकारचे आकडे समोर आणले तो सर्व सरकारी दबाव तंत्र व भाजपने फेकलेल्या पैशांचा खेळ आहे, पण पैशांच्या हव्यासापायी या ‘पोल’ कंपन्यांनी स्वतःचीच बेअब्रू करून घेतली", असा टोलाही सामना अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN: 0,0,0,0,0,0..टीम इंडियाची स्पीड मशीन जोमात; Mayank ने पहिल्याच ओव्हरमध्ये नोंदवला मोठा रेकॉर्ड

Pune Crime : ड्रग्स, कोयते गँग, हिट अॅण्ड रन; पुणे बनलंय क्राईम कॅपिटल

Bigg Boss Marathi 5 Winner: अखेर तो क्षण आला! 'सुरज'चा गोलीगत विजय, ठरला बिग बॉस मराठी 5 व्या पर्वाचा विनर; मिळाले 'इतके' लाख रुपये

IND vs BAN: अर्शदीप सिंगच्या गतीसमोर बांगलादेशचा सुपडा साफ; भारतापुढे माफक आव्हान

Marathi News Live Updates : उद्योजक जितेंद्र तोरणे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, श्रीरामपूरमधून उमेदवारीसाठी इच्छुक

SCROLL FOR NEXT