Uddhav Thackeray Criticized Maharashtra Government Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO: उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, उद्धव ठाकरेंचा जोरदार निशाणा

Uddhav Thackeray Criticized Maharashtra Government: 'उद्यापासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. हे खोके सरकारचे शेवटचे अधिवेशन असणार आहे.', अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली आहे.

Priya More

मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकेर (Aditya Thackeray) आणि तेजस ठाकरे यांच्यासह मतदान केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महायुती सरकावर जोरदार टीका केली. 'उद्यापासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. हे खोके सरकारचे शेवटचे अधिवेशन असणार आहे. अधिवेशनात खोके सरकारला निरोप द्यायाचा आहे.', अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली आहे. तसंच, 'निवडणूक असल्यामुळे आज राजकीय विषयावर भाष्य करणार नाही. उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात राजकीय भाष्य करेन.', असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधक महायुती सरकारला घेरण्याच्या तयारीमध्ये आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने विरोधकांना चहापानांचे निमंत्रण देण्यात आले होते. पण विरोधकांना चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT