Shiv Sena support Common Civil Law Saam Tv
मुंबई/पुणे

Common Civil Law: समान नागरी कायद्याला शिवसेनेचा पाठिंबा, पावसाळी अधिवेशनात मांडणार समर्थन प्रस्ताव

समान नागरी कायद्याला शिवसेनेचा पाठिंबा, पावसाळी अधिवेशनात मांडणार समर्थन प्रस्ताव

साम टिव्ही ब्युरो

Shiv Sena support Common Civil Law: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याचे सुतोवाच केले होते. बाळासाहेब ठाकरे यांचे आणखी एक स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल उचलले आहे. मात्र बाळासाहेबांशी रक्ताचे नाते सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी या कायद्याला विरोध करण्यास प्रारंभ केला आहे, असं शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे म्हणाले आहेत. एका आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले, खरे पाहत उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेला साजेशी भूमिका घेऊन त्यांच्या विचारांचे समर्थन करण्याची गरज होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असून शिवसेनेचा समान नागरी कायद्याला बिनशर्त पाठींबा आहे.

राहुल शेवाळे म्हणाले की, ''मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मु्ख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आज एक वर्ष झाले. आजचा हा दिवस बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नपूर्तीचा दिवस साजरा करत आहोत. निष्ठावान शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री व्हावा ही बाळासाहेबांची इच्छा भाजपच्या सहकार्याने पूर्ण झाली आहे. राम मंदिर निर्मिती करणे, कलम ३७० रद्द करणे व समान नागरी कायदा बनवणे ही बाळासाहेबांची 3 स्वप्ने होती. त्यापैकी दोन स्वप्ने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केली आहेत.''

ते म्हणाले, समान नागरी कायदा लवकरच येईल. शिवसेनेचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याला पूर्ण पाठिंबा दिला आहे. बाळासाहेबांच्या एक राष्ट्र, एक कायदा या संकल्पनेशी आम्ही कटिबद्ध आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेवाळे म्हणाले, ''शिवसेनाप्रमुखांशी रक्ताचे नाते सांगणारेच या कायद्याला विरोध करत आहेत. या कायद्याबाबत गैरसमज पसरवत आहेत. त्यांचा खरा चेहरा समोर येत आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे शिष्टमंडळ नुकतेच उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी सेना भवनमध्ये गेले होते. उद्धव ठाकरे मुस्लिमांना पाठिंबा देतील, असा विश्वास मुस्लिमांना आहे.''  (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''या कायद्यामुळे हिंदूना त्रास सहन करावा लागेल असे ते म्हणत आहेत, मात्र प्रत्यक्षात हा कायदा हिंदूंना प्रभावित करणार नाही तर फक्त गांधी कुटुंबाला प्रभावित करेल, त्यामुळे उद्धव ठाकरे या कायद्याला विरोध करत आहेत, अशी टीक शेवाळे यांनी केली. या कायद्याच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होईल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident News : १५ गाड्या चिरडल्या, ८ जणांचा होरपळून गेला जीव, १५ जण जखमी; दुर्घटनेतील मृतांची अन् जखमींची नावे आली समोर

Delhi Blast: सिरीयल स्फोटाचा कट उधळला, दहशतवाद्यांच्या टार्गेटवर 4 शहर; 32 गाड्यांमध्ये विध्वंसक बॉम्ब?

Eyelashes Care: खोट्या पापण्या वापरणं करा बंद; फक्त या घरगुती सामग्रीच्या तेलाने पुन्हा जाड आणि लांब होतील पापण्या

Bihar Election Result Live Updates: पोस्टल मतमोजणी संपली, सुरूवातीचे कल एनडीएच्या बाजूने

कार्तिक कृष्ण दशमी: आज सिंह राशीवर चंद्राची कृपा; पाहा कोणत्या राशींना मिळणार मोठा लाभ

SCROLL FOR NEXT