Thackeray Group BMC Morcha: मोठी बातमी! ठाकरे गटाच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी, मात्र घातल्या 'या' अटी

मोठी बातमी! ठाकरे गटाच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी, मात्र घातल्या 'या' अटी
Thackeray Group BMC Morcha
Thackeray Group BMC MorchaSaam Tv
Published On

Thackeray Group BMC Morcha: मुंबई महानगपालिकेवर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात १ जुलै रोजी निघणाऱ्या ठाकरे गटाच्या मोर्च्याला पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी देत असताना पोलिसांनी काही अटी-शर्तीही घातल्या आहेत.

“मुंबईकरांच्या पैश्यांची लूट” होत आहे, असा आरोप ठाकरे गटाकडून सरकारवर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

Thackeray Group BMC Morcha
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना आज मिळू शकते खुशखबर, पगारात होणार घसघशीत वाढ

शिवसेनाचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा मोर्चा १ जुलै रोजी दुपारी 2 वाजता वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो सिनेमा) येथून सुरु होईल. तसेच महानगरपालिका मार्गावरून मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयापर्यंत जाईल.  (Latest Marathi News)

पोलिसांनी घातलाय 'या' अटी

१. मोर्चा दिलेल्या मार्गावरुनच नेण्यात यावा व कोणत्याही परिस्थितीत मार्ग बदलू नये. मोर्चा निघाल्यानंतर मार्गावर रेंगाळत ठेवू नये.

२. नमुद आयोजित कार्यक्रमापूर्वी आवश्यक असलेल्या इतर शासकीय विभागाचे आवश्यक ते परवाने प्राप्त करावेत. तसेच आपले तर्फे उभारण्यात आलेल्या स्टेजचे संबंधीत ठेकेदाराकडून तसेच सार्वजनिक बांधकाम स्टेज स्टॅबिलीटी प्रमाणपत्र प्राप्त करून, सर्व परवाने आझाद मैदान पोलीस ठाणे येथे कार्यक्रमा पूर्वी सादर करावेत.

३. मोर्चा / सभेदरम्यान कोणत्याही व्यक्तीच्या समुदायाच्या धार्मीक /जातीय/ सामाजीक / राजकीय भावना दुखावल्या जातील अशा आक्षेपार्ह प्रतिमांचे, देखाव्यांचे, बॅनरचे प्रदर्शन करणे, घोषणा देणे, आक्षेपार्ह व अश्लील गाणे अथवा वाद्य वाजविणे किंवा तत्सम प्रकार करता येणार नाहीत. मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येतांना व परत जातांना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.

Thackeray Group BMC Morcha
Delhi Ordinance 2023 News : केंद्राच्या अध्यादेशाविरोधात केजरीवाल सरकार सुप्रीम कोर्टात, याचिकेत काय आहे मागणी?

४. मार्चमध्ये बोलावलेल्या सर्व वाहनांना पोलीसांनी दिलेल्या मार्गाने प्रवास करण्याचा व मार्ग न बदलण्याच्या सुचना द्याव्यात वाहनांनी शहरात प्रवासा दरम्यान त्या त्या रस्त्यावर विहीत वेगमर्यादिचे पालन करावे. मार्चमध्ये आलेल्या नागरीकांना त्यांचे वाहने (दोन चाकी, चार चाकी व इतर कोणतेही वाहन) पार्कंगसाठी निर्धारीत केलेल्या ठिकाणीच पार्किंग करण्याच्या सुचना द्याव्यात. मार्चासाठी येताना अथवा परत जातांना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रॅली काढू नये. त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री यांना अधिकृत सुरक्षा पुरविण्यात आली असून आयोजकांनी त्यांच्या मोर्च्याच्या तसेच सभेच्या ठिकाणी येण्याच्या व सभेवरुन परत जाण्याच्या वेळी कोणतीही रॅली काढू नये.

५. मोर्च्याच्या दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, लाठी, पुतळे इत्यादी बाळगू, नये अगर प्रदर्शन करू नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये. (Latest Political News)

६. सभेचे ठिकाणी पुरेशे अग्निशमन दल हजर राहील याची दक्षता घ्यावी. सभेचे ठिकाणी महानगर पालीका यांचेशी संपर्क साधून अग्निशमन यंत्रणा व आवश्यक Portable Fire Extinguisher यंत्र राहतील याची दक्षता घ्यावी. ८. मोर्चा / सभेचे ठिकाणी रुग्णवाहीकेची व्यवस्था करावी. तसेच तात्पुरते वैद्यकीय सेवा, वैद्यकीय अधिकारी व आपात्कालीन व्यवस्थेचे आयोजन करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com