Uddhav Thackeray On India Aghadi PM Saam TV
मुंबई/पुणे

Politics News : मोदी पुन्हा शपथ घेतील, पण त्यांना कुबड्या घेऊनच राष्ट्रपती भवनात जावे लागेल; 'सामना'तून टोला

Narendra Modi swearing : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामनाच्या 'रोखठोक'मधून टोला लगावण्यात आला आहे.

Satish Daud

लोकसभा निवडणूक निकालात भाजपला अपेक्षेप्रमाणे जागा जिंकता आल्या नाहीत. त्यांना स्वबळावर बहुतमताचा आकडा देखील गाठता आला नाही. मात्र, तरीही मित्रपक्षांच्या मदतीने आज भाजप सत्तास्थापन करणार आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामनाच्या 'रोखठोक'मधून टोला लगावण्यात आला आहे.

"लोकसभा निकालाने मोदी व त्यांच्या लोकांचे पाय जमिनीवर येतील असे वाटले होते, पण बहुमत नसतानाही मोदी नितीश कुमार, चंद्राबाबू, चिराग पासवान यांच्या कुबडय़ा घेऊन सरकार बनवीत आहेत. मित्रपक्षांच्या अटी मानून मोदी सरकार बनवतील, पण चालवू शकतील काय?", असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

"महाराष्ट्रात महाविकास आघाडीने 30 जागा जिंकून देवेंद्र फडणवीसांचे ‘मी परत येईन’ नाटक बंद पाडले. अजित पवारांपासून एकनाथ शिंदेंपर्यंत व मोदी-शहांपासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येकाने धडा घ्यावा असा हा निकाल. मोदी पुन्हा शपथ घेतील, पण त्यांना कुबडय़ा घेऊन राष्ट्रपती भवनात जावे लागेल", असा टोला सामनातून लगावण्यात आला.

"मोदी यांना पाठिंबा द्यायच्या बदल्यात या दोन्ही बाबूंना जे हवे ते दिले जाईल काय? चंद्राबाबू यांना लोकसभा अध्यक्षपद, गडकरींकडे असलेले बांधकाम, रस्ते उभारणी व ऊर्जा मंत्रालय हवे, तर नितीश कुमारांना गृह, संरक्षण, परिवहन अशी खाती हवीत. मोदी व शहा यांचा प्राणच ओरबाडून घेण्याचा हा प्रकार आहे", असं सामनाच्या रोखठोकमधून मांडण्यात आलं.

"निवडणुकीत इंडिया आघाडीला 125 जागाही जिंकता येणार नाहीत अशी भाषा मोदी करीत होते. त्या इंडियाने मोदींचे बहुमताचे पंखच कापले व त्यांना जमिनीवर आणले. महाराष्ट्र व उत्तर प्रदेशमुळे मोदींचे स्वप्न भंगले. अखिलेश यादव यांनी श्रीरामाच्या भूमीतच मोदींना रोखले", अशी टीका सामनातून करण्यात आली.

"नव्या रचनेत अमित शहांकडे गृहखाते राहील काय? याच गृहखात्याच्या गैरवापराने नरेंद्र मोदींचे नुकसान झाले व लोकांच्या दृष्टीने ते खलनायक ठरले. भविष्यात अमित शहांविरोधात पक्षातच आवाज उठेल असे चित्र आहे. बहुमत गेल्याने लोकांची भीती मेली आहे. बहुमत गमावलेल्या भाजपने मोदी यांना सहन करू नये, असा आवाज महाराष्ट्रातच उठण्याची शक्यता जास्त आहे". असंही रोखठोकमध्ये मांडण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Sushil Kedia: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

SCROLL FOR NEXT