Vinayak raut  saam tv
मुंबई/पुणे

'शिवसैनिकांकडून असा प्रकार...'; उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाल्यानंतर विनायक राऊतांची प्रतिक्रिया

वाहनावर हल्ला करणारे कोण होते, हे अद्याप अस्पष्ट झालेले नाही. उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाल्यानंतर शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Vishal Gangurde

पुणे : राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गट राजकीय संघर्ष पेटला आहे. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. आज पुण्यातील कात्रजमध्ये शिंदे गटाचे आमदार, माजी मंत्री उदय सामंत (Uday samant) यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप होत आहे. मात्र, या वाहनावर हल्ला करणारे कोण होते, हे अद्याप अस्पष्ट झालेले नाही. उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाल्यानंतर शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ( Vinayak Raut on Uday samant car attack )

पुण्यातील कात्रजमध्ये उदय सामंत यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात त्यांच्या वाहनाची काच फुटली आहे. उदय सामंत यांनी या हल्ल्याची तक्रार कोथरूड पोलीस स्थानकात केली आहे. या हल्ल्यानंतर शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांनी शिवसैनिकांनी उदय सामंत यांच्या वाहनावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याचे आरोप फेटाळले आहेत. खासदार विनायक राऊत म्हणाले, 'याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. तसा काही प्रकार शिवसैनिकांकडून असा प्रकार झाला असेल यावर माझा विश्वास नाही'.

तर शिंदे सरकार एका महिन्यात कोसळणार या आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना विनायक राऊत म्हणाले, '१०० टक्के हे सरकार पडणार आहेत. आदित्य ठाकरे यांनी केलेलं विधान अगदी खरंच आहेच. मंत्रिमंडळात २ जण मंत्री राहिले आहेत. त्यावरून हे दिसते की हे सरकार कोसळणार आहे'. शिवसेनेच्या सुप्रीम कोर्टाच्या लढाईवर भाष्य करताना राऊत म्हणाले, 'सुप्रीम कोर्टात उद्या लढाई होईल. आम्हाला खात्री आहे की, आमची बाजू न्यायाची बाजू आहे. न्याय देवता आम्हाला नक्की न्याय देईल'.

महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की, दोघांच्या मंत्रिमंडळाने आधीच्या ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय रद्द केले आहेत. ठाकरे सरकारचे २५० निर्णय रद्द केले आहेत. यातील अनेक निर्णय मागासवर्गीय समाजाच्या हिताचे होते. मागासवर्गीय कल्याण निधीच्या संबंधात होते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीशी निगडीत होते. ते सुद्धा त्यांनी रद्द केले आहेत, असे शिंदे सरकारने घेतलेल्या निर्णयावर राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : तेजस्वी यादव १२ हजार मतांनी आघाडीवर

Palak Bhaji Recipe: चहासोबत रोज कांदे पोहे कशाला? थंडीत करा गरमागरम पालक भजीचा बेत, नोट करा रेसिपी

Maharashtra Live News Update: जैन बोर्डिंग व्यवहारातील सेल डीड कायदेशीररित्या रद्द करण्यास परवानगी

South Indian Food: साऊथ इंडियन पदार्थ एवढे फेमस का आहेत? वाचा कारणे

Fastag: वाहन चालकांसाठी महत्वाची बातमी! उद्यापासून फास्टॅग नियमात मोठे बदल; एका चुकीसाठी द्यावे लागतील दुप्पट पैसे

SCROLL FOR NEXT