Sanjay Raut  saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut ED Custody : संजय राऊत यांना जामीन नाहीच; ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत मुक्काम

संजय राऊत यांना आज जामीन मिळू शकलेला नाही.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीच्या (ED) अटकेत असलेले शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आजही दिलासा मिळालेला नाही. संजय राऊत यांना आज जामीन मिळू शकलेला नाही. त्यांचा ईडी कोठडीतील मुक्काम आणखी वाढला आहे. त्यांच्या ईडी कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. (Sanjay Raut ED Custody Latest News)

पत्राचाळ प्रकरणामध्ये ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांना ३१ ऑगस्ट रोजी अटक केली होती. जवपास १४ तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना ईडीच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आलं असता, कोर्टाने ३ दिवसांची कोठडी सुनावली होती. आज कोठडी संपल्यामुळे पुन्हा एकदा संजय राऊत यांना विशेष ईडी कोर्टात हजर केले.

कोर्टात येताना संजय राऊत हे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह असलेला भगवा रूमाल घालून आले होते. त्यानंतर राऊतांच्या प्रकरणावर सुनावणी सुरू झाली. ईडीने कोर्टात संजय राऊत यांची १० ऑगस्टपर्यंत कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. अलिबाग येथे जमिन घेतली तेव्हा जमिन मालकाला १.१७ कोटी रुपये रोख दिल्याचे ईडीने तपासात उघड झाल्याचं सांगितलं. (Sanjay Raut Todays News)

५ ऑगस्टला या प्रकरणी काही जणांना समन्स बजावले आहेत. त्यांची चौकशी करायची आहे. जे काही व्यवहार संजय राऊत यांच्या खात्यावरून झालेले आहेत, त्याची पडताळणीदेखील करायची आहे, असे ईडीतर्फे कोर्टात सांगण्यात आले. दरम्यान, कोर्टाने ईडीची मागणी मान्य करत संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

यादरम्यान संजय राऊत यांचे वकील मनोज मोहिते यांनी ईडीवर गंभीर आरोप केले. अनोळखी व्यक्तीकडून त्यांना पैसे मिळाले तसेच अलिबाग येथील जमिनीच्या खरेदी प्रकरणाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यात रोख रकमेचा वापर करण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे. मात्र हे आरोप नवे नाहीत. याआधीही या आरोपांप्रकरणी चौकशी झालेली आहे. मात्र ईडीकडून दबाव आणला जात आहे, धमकावले जात आहे, असे मनोज मोहिते यांनी म्हटलं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT