नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या चौकशीनंतर ईडीनं (ED) नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मोठी कारवाई केली. हेराल्ड हाऊसमधील यंग इंडियनचे कार्यालय ईडीकडून सील करण्यात आलं. या कारवाईनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रथमच याबाबत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. 'मी मोदींना घाबरत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा', असं थेट आव्हानच राहुल गांधींनी दिलं. (PM Narendra Modi vs Rahul Gandhi Latest News)
'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे जे काही राजकारण करत आहेत ते सर्वलोकशाही विरोधात आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत दबाव टाकून आम्हाला गप्प करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण आम्ही घाबरणार नाही. मी मोदींना घाबरत नाही, तुम्हाला जे करायचे ते करा', असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
याशिवाय 'देशाची रक्षा करणं, लोकशाहीचं रक्षण करणं माझं काम आहे, देशात एकात्मता ठेवणं ते मी करतच राहणार. यांना काहीही करू द्या आम्हाला अजिबात फरक पडत नाही. भाजप ईडीचा दबाव टाकून आम्हाला घाबरवायचा प्रयत्न करत आहे. मात्र आम्ही पळून जाणाऱ्यातले नाहीत'. असंही राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी यांची चौकशी झाली होती. त्यानंतर ईडीने विविध ठिकाणी छापेही टाकले होते. सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीनंतर त्याविरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी निदर्शने केली होती. राहुल गांधीही रस्त्यावर उतरले होते. त्याचवेळी राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. भाजपकडून केंद्रीय तपास संस्थांचा गैरवापर होत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला होता. (Rahul Gandhi Modi News)
त्यानंतर काल म्हणजेच बुधवारी ईडीनं नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित हेराल्ड हाऊसमधील यंग इंडियनचे कार्यालय ईडीनं सील केलं. सक्तवसुली संचालनालयाने परवानगीशिवाय नॅशनल हेराल्ड हाऊसमधील कार्यालय उघडण्यास मनाई केली आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
काँग्रेसचे मुख्यालय आणि तेथील रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाची सुरक्षाव्यवस्था देखील वाढवण्यात आली आहे. ईडीने ही कारवाई नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित दिल्लीतील विविध १२ ठिकाणांवर आणि दिल्लीच्या बाहेरील अन्य ठिकाणांवर केलेल्या छापेमारीनंतर केली आहे. या प्रकरणात यापूर्वी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ईडीने चौकशी देखील केली आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.