तब्ब्ल 8 तासाच्या ED चौकशीनंतर रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया Saam Tv
मुंबई/पुणे

तब्ब्ल 8 तासाच्या ED चौकशीनंतर रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय असणारे शिवसेना आमदार रवींद्र वायकरयांची काल ईडीने चौकशी करण्यात आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय असणारे शिवसेना आमदार रवींद्र वायकर (Shiv Sena MLA Ravindra Waikar) यांची काल ईडीने चौकशी (ED inquiry) करण्यात आली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आमदार रवींद्र वायकर यांची तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली आहे. नेमकी कोणत्या प्रकरणामुळे ही चौकशी करण्यात आली आहे.

याविषयीची माहिती समोर आली नव्हती. पण आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदार रवींद्र वायकर यांना या ईडी चौकशी संदर्भात विचारले असता त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना काही शंका होते आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी बोलावले होते. त्या संदर्भामध्ये त्यांनी प्रश्न विचारले आणि मी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

हे देखील पहा-

त्यानंतर त्यांच्या शंकांचे निरसण झाले आहे. कोणत्या शंका होते या संदर्भात विचारले असता रवींद्र वायकर म्हणाले कोणत्या शंका होते हे मी सांगू शकत नाही. मी ३-४ तास ईडी कार्यालयामध्ये होतो आणि सर्व पद्धशीरपणे काम सुरू होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्यामुळे तुम्हाला अधिवेशनाच्या एकदिवस अगोदरच चौकशीकरिता बोलावले असे वाटतं का? यावर रवींद्र वायकर म्हणाले की असे असू शकते.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी काही आरोप करत कागदपत्रे सादर केली होती. त्यामुळे ईडीने चौकशीकरिता बोलावले होते का? यावर रवींद्र वायकर म्हणाले, तसे काही नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांचे पूर्ण समाधान झाले आहे आणि मला ते परत बोलावणार नाही. काही महिन्याअगोदर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्या पत्नीच्या नावाचा उल्लेख करत जमिनीविषयी गंभीर आरोप करण्यात आले होते.

त्यानंतर वायकर यांनी सोमय्यांना मानहानीची नोटीस पाठविण्यात आली होती. या सर्व घडामोडीवर आज अचानक वायकरांची ईडी चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ईडीकडून वेगवेगळ्या प्रकरणांवरुन रवींद्र वायकरांची चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे याअगोदर देखील शिवेसेनेच्या काही नेत्यांना ईडीच्या ससेमिऱ्याला सामोरे जावे लागले आहे.

यामध्ये भावना गवळी (Bhavana Gawali), प्रताप सरनाईक, आनंदराव अडसुळ या शिवसेना (Shiv Sena) नेत्यांचा समावेश आहे. रवींद्र वायकर मातोश्री क्लब, शिवछत्रपती संस्थान अशा विविध संस्थांचे ते पदाधिकारी आहेत. या दरम्यान मातोश्री क्लबमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप रवींद्र वायकर यांच्यावर करण्यात आला होता. अशा पद्धतीच्या काही वेगवेगळ्या आरोपांवरुन ईडीने वायकरांची आठ तास चौकशी केली असल्याचं बोललं जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tanvi Mundle Age: मराठमोळ्या अभिनेत्रीचं खरं वय किती, प्रसिद्ध मालिकेत करतेय काम

Baramati Assembly Election Result: बारामतीमध्ये अभिजीत बिचकुलेंना २ फेरीत फक्त ९ मतं, पवार काका-पुतण्यांना दिलं होतं आव्हान

Gulabrao Patil : लाडक्या बहिणींनी भावांना दिलेला आशीर्वाद; गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पूर्व मतदारसंघातून ठाकरे गटाचे वरूण‌ सरदेसाई आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT