Shiv Sena MLA disqualification hearing schedule decided, Uddhav Thackeray Eknath Shinde Maharashtra Politics Saam Tv
मुंबई/पुणे

Shiv Sena News: शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक ठरलं; 20 ऑक्टोबरला मोठा निर्णय होणार?

Satish Daud

सूरज मसुरकर, साम टीव्ही

Shiv Sena MLA Disqualification Hearing Schedule

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आमदार अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक साम टीव्हीच्या हाती लागलं आहे. अपात्रतेची सुनावणी नोव्हेंबरपर्यंत चालणार असून सर्व याचिकांवरील सुनावण्यात एकत्रित घ्यायच्या की नाही, याबाबत 20 ऑक्टोबरला मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

आमदार अपात्रतेची सुनावणी नोव्हेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती विधीमंडळातील सूत्रांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 25 सप्टेंबर रोजी आमदार अपात्रतेची सुनावणी घेतली होती.

यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) वतीने सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या, अशी मागणी करण्यात आली. तर आमदारांची सुनावणी वेगवेगळी घ्या, अशी मागणी शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली.

दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणीचे वेळापत्रक निश्चित केले असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे. आमदार अपात्रतेची (Eknath Shinde) सुनावणी नोव्हेंबरपर्यंत चालणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं आहे.

त्यामुळे आमदार अपात्र प्रकरणाला आता वेग आल्याचं दिसून येतंय.

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रक

  • 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान चालणार युक्तिवाद

  • 23 नोव्हेंबरनंतर दोन आठवड्यात होणार अंतिम सुनावणी

  • 13 ऑक्टोबरला सर्व याचिका एकत्र करायच्या की नाही? यावर सुनावणी पार पडेल

  • 20 ऑक्टोबरला सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यायची की नाही याचा निर्णय.

  • 13 ते 20 ऑक्टोबर दरम्यान दोन्हीही गटांनी एकमेकांना दिलेली कागदपत्रांची विधिमंडळ तपासणी करेल.

  • 20 ऑक्टोबर रोजी सर्व याचिका एकत्रित करायच्या की नाही यावर निकाल दिला जाईल.

  • याशिवाय 20 ऑक्टोबरला काही अधिकची कागदपत्र एखाद्या गटाला सादर करायची असतील, तर त्यासाठी संधी दिली जाईल.

  • 27 ऑक्टोबरला दोन्हीही गट आपापलं म्हणणं (स्टेटमेंट) मांडतील.

  • 6 नोव्हेंबर पर्यंत दोन्ही गट आपापले मुद्देसूद मांडणी करतील व दावे आणि प्रतिदावे करतील.

  • 10 नोव्हेंबरला दोन्ही गटांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सुनावणी पार पडेल.

  • 20 नोव्हेंबरला दोन्ही गटांच्या साक्षीदारांची यादी सादर केली जाईल.

  • 23 नोव्हेंबरला साक्षीदारांची उलट साक्ष घेतली जाईल.

  • सर्व पुरावे तपासल्या नंतर पुढील दोन आठवड्यात अंतिम सुनावणी पार पडेल.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

SCROLL FOR NEXT