पुण्यातील नवले पुलावर होणाऱ्या अपघात संदर्भात सुरू होतं फेसबुक लाईव्ह
अपघात रोखण्याबाबत उपाययोजना काय करता येतील त्याबाबत देत होते माहिती.
नवले पूल परिसरात दोन रिक्षांची धडक होत अपघात
शिवसेनेचे नेते वसंत मोरे अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. फेसबूक लाइव्ह करताना एक वाहन थेट वसंत मोरेंच्या दिशेने भरधाव वेगाने आले. प्रसंगावधान वसंत मोरे अपघातातून थोडक्यात बचावले.
पुण्यातील नवले पुलावर सतत होणाऱ्या दुर्घटनांबाबत शिवसेना नेते वसंत मोरे फेसबूक लाईव्ह करत होते. नवले पुलावरील अपघात रोखण्याबाबत उपाययोजना काय करता येतील या विषयावर ते फेसबुक लाईव्ह करत होते. त्याच दरम्यान एक वाहन त्यांच्या विरुद्ध दिशेने येत होते. ते वाहन थेट वसंत मोरे उभे असलेल्या दिशेने भरधाव वेगाने आलं. पण वेळची मोरे यांचा कॅमेरामन आणि स्वत: वसंत मोरे रस्त्याच्या बाजुला धावल्यानं ते बचावले.
काही दिवसापूर्वी पुण्यातील नवले पुलावर एक भीषण अपघात झाला होता. यात एका ट्रकनं १० ते १२ वाहनांना उडवलं होतं. तर अपघातात एक ट्रकमध्ये अडकलेल्या कारनं पेट घेतला होता. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली होती. त्यानंतर नवले पूल चर्चेत आला. दरम्यान या पुलावर इतका भयानक अपघात होणं हे पहिल्यांदा घडलं नाहीये. याआधीही देखील या पुलावर किती वेळा मोठे अपघात घडलेत. वारंवार या पुलावर अपघात घडत असल्यानं राजकीय विरोधकांनी आणि तेथील नागरिकांनी तेथील प्रशासनावर टीका केली होती.
तर या पुलावर होणाऱ्या अपघातांवर आळा घालण्यासाठी वाहतुकीचे काही नियम घालून देण्यात आले आहेत दरम्यान त्याच पुलामधील दोषाबाबत शिवसेना नेते वसंत मोरे तात्या फेसबूक लाईव्ह करत बोलत होते. अपघात रोखण्यासाठी काय उपाय केले जाऊ शकतात, याची माहिती देण्यासाठी वसंत मोरे फेसबूक लाईव्ह करत होते, त्यावेळी एक उलट्या दिशेने येणारे वाहन आले. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, वाहनधारक किती वेगाने कार चालवत होता. तात्यांच्या अंगावरच वाहन चढवणार होत असं व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
पुण्यातील नवले पूल परिसरात अपघात
पुण्यातील नवले पूल परिसरात दोन रिक्षांची धडक होत अपघात झालाय. यादरम्यान प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात दोन्ही रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.