Sanjay Raut Latest Marathi News, Eknath Shinde News
Sanjay Raut Latest Marathi News, Eknath Shinde News Saam Tv
मुंबई/पुणे

ईडीच्या भीतीने आमदार पळाले; यामागे भाजपचंच कारस्थान; संजय राऊतांचा थेट आरोप

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेचे (Shivsena) अनेक आमदार फुटले आहेत. या फुटीवरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट भाजपवर हल्ला चढवला आहे. आमदार फुटीमागे भाजपचंच कारस्थान आहे. ईडीच्या भीतीने आणि अमिषाने हे आमदार पळाले आहेत. भाजपच्या (BJP) कारस्थानाशिवाय भाजपशासित राज्यात आमदार डांबून ठेवणं शक्यच नाही, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. (Sanjay Raut Latest Marathi News)

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं असून सरकार लवकरच पडेल अशा चर्चा सुरू आहे. अशातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.

ईडीच्या भीतीने आणि अमिषाने हे आमदार पळाले आहेत. स्वत: वाघ किंवा बछडे म्हणणारे पळपुटे निघाले, असा जोरदार हल्लाबोलही त्यांनी केला आहे. जे आमदार पक्ष सोडून गेले, ते कोणत्या परिस्थितीत पक्ष सोडून गेले याचा खुलासा लवकरच होईल. आमचे दोन आमदार पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात ते त्यांच्यासोबत काय काय घडलं आणि इतर आमदारांना कशी वागणूक दिली जातेय याची माहिती देतील, अशी माहितीही त्यांनी दिली. (Eknath Shinde Latest News)

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, "बंडखोर कोण आहे? शिवसेना हा पक्ष स्वतंत्र आहे, विधिमंडळ हा पक्ष वेगळा आहे. ईडीच्या आणि अन्य काही अमिषाला बळी पडून काही आमदार पळाले असतील. विषेशता जे स्वत: ला बछडे वाघ समजून घ्यायचे, ते म्हणजे पक्ष नाही, आपण जो काल रस्त्यावर पाहिला तो पक्ष आहे. हा पक्ष अजूनही मजबूत आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजूबत आहे. चार आमदार अजून काही खासदार आणि दोन नगरसेवक गेले म्हणजे पक्ष नाही होत. हे का गेले आहेत सोडून याचे कारणं लवकरच समोर येतील". असं संजय राऊत म्हणाले.

"पळून गेलेल्या आमदारांसोबत आमची चर्चा सुरू आहे. अजूनही त्यातले काही लोकं आमच्या संपर्कात येत आहेत, आम्हाला कसं जबरदस्तीने नेलं आहे तिकडे हे सांगत आहे. आज आमच्या दोन आमदाराची नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांची पत्रकार परिषद घेणार आहे. ते तुम्हाला सगळी कथा सांगतील", असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT