पळालेले आमदार म्हणजे शिवसेना नव्हे; संजय राऊत स्पष्टच बोलले

त्यांना बंड करू द्या आम्ही शिवसेनेसोबत आहोत असंही संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut News, Shivsena Political Crisis
Sanjay Raut News, Shivsena Political CrisisSaam Tv
Published On

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या काही आमदारांना घेऊन बंड केल्याने राज्याचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळेल अशा स्वरुपाची चर्चा सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे. अशातच शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना पळून गेलेले आमदार म्हणजे शिवसेना नव्हे असं म्हटलं आहे. त्यांना बंड करू द्या आम्ही शिवसेनेसोबत आहोत असंही संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut Latest News)

Sanjay Raut News, Shivsena Political Crisis
'हे माऊली तुझा आर्शिवाद सदैव राहू दे, तुझ्या पंढरपूरच्या पुजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे'

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं असून सरकार लवकरच पडेल अशा चर्चा सुरू आहे. अशातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.

याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना माध्यमांसोबत चर्चा केली. पळून गेलेले आमदार म्हणजे शिवसेना नव्हे. आमचे दोन आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांची पत्रकार परिषद घेणार आहे. ते तुम्हाला सगळी कथा सांगतील असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. (Eknath Shinde Latest News)

Sanjay Raut News, Shivsena Political Crisis
Maharashtra Politics : शिवसेनेत बंडखोरी झाली असताना प्रकाश आंबेडकरांना वेगळीच शंका

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, "बंडखोर कोण आहे? शिवसेना हा पक्ष स्वतंत्र आहे, विधिमंडळ हा पक्ष वेगळा आहे. ईडीच्या आणि अन्य काही अमिषाला बळी पडून काही आमदार पळाले असतील. विषेशता जे स्वत: ला बछडे वाघ समजून घ्यायचे, ते म्हणजे पक्ष नाही, आपण जो काल रस्त्यावर पाहिला तो पक्ष आहे. हा पक्ष अजूनही मजबूत आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजूबत आहे. चार आमदार अजून काही खासदार आणि दोन नगरसेवक गेले म्हणजे पक्ष नाही होत. हे का गेले आहेत सोडून याचे कारणं लवकरच समोर येतील". असं संजय राऊत म्हणाले. (Shivsena Marathi News)

"पळून गेलेल्या आमदारांसोबत आमची चर्चा सुरू आहे. अजूनही त्यातले काही लोकं आमच्या संपर्कात येत आहेत, आम्हाला कसं जबरदस्तीने नेलं आहे तिकडे हे सांगत आहे. आज आमच्या दोन आमदाराची नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांची पत्रकार परिषद घेणार आहे. ते तुम्हाला सगळी कथा सांगतील", असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com