Anil Parab Latest Marathi News, Anil  Parab ED Case News updates
Anil Parab Latest Marathi News, Anil Parab ED Case News updates Saam Tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! अनिल परब ईडी चौकशीला गैरहजर?; हे कारण आलं समोर

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : आताची एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेना (Shivsena) नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) ईडी चौकशीला जाणार नसल्याची माहिती आहे. साई रिसॉर्टप्रकरणी त्यांना समन्स (ED Summons) पाठवण्यात आलं होतं. आज 11 वाजता त्यांची चौकशी होणार होती. पण आधीच्या नियोजित कामामुळे ते चौकशीला हजर राहणार नाहीत. (Shivsena Anil Parab Latest News)

मात्र, असं असलं तरी, अनिल परब यांचे वकील ईडी कार्यालयात जाणार आहेत आणि काही कामामुळे परब हजर राहणार नसल्याची माहिती ते ईडीला देणार आहे. साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने अनिल परब यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले आहे.

अनिल परब यांनी दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केला होता. या रिसॉर्ट प्रकरणात काही दिवसांपूर्वी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीकडून धाडसत्र हाती घेण्यात आलं होतं. (Anil Parab Latest Marathi News)

त्यानंतर आता अनिल परबांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र आता अनिल परब हे चौकशीसाठी आज हजर राहणार नसल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,अनिल परब हे मुंबईबाहेर असल्याने ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार नाही. आज त्यांचे वकील हे ईडी कार्यालयात जाणार असून काही कामामुळे परब हजर राहणार नसल्याची माहिती देतील. तसंच पुढची तारीख मागून घेतील, अशी माहिती आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Vastu Tips: सकाळी तुळशीला पाणी घालण्याची योग्य वेळ काय?

Today's Marathi News Live : महाविकास आघाडीची उद्या सेनाभवनमध्ये संविधान वाचवा सभा

Israel-Hamas War: इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Maharashtra Election: महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच कायम; ठाणे मतदारसंघ कुणाच्या पारड्यात, आज घोषणा होणार?

Tamannaah Bhatia Today Inquiry : तमन्ना भाटियाची महाराष्ट्र सायबर सेलकडून होणार चौकशी, जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT