Eknath Shinde  Saam Tv
मुंबई/पुणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! शिवसेना पक्षप्रमुखांनी पदावरून हटवले

राज्यातील राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यातील राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या अडचणीत भर पडली आहे. पक्षाने थेट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेनेच्या नेते पदावरून हकालपट्टी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhv Thackeray) यांनी ही हकालपट्टीची कारवाई केली आहे. त्यामुळे हकालपट्टीची कारवाई केल्याने त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. (Eknath Shinde News In Marathi )

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेना पक्षाचे चाळीस हून अधिक आमदार फोडले. त्यानंतर सुरत गाठले. सूरतनंतर गुवाहाटी येथे मुक्काम ठोकला. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही हकालपट्टीची कारवाई केली आहे. पक्षाने एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाचे सदस्यही नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत त्यांच्यावर कारवाई केली आहे. 'तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात आणि स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्वही सोडले आहे.त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझ्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून मी तुम्हाला पक्ष संघटनेतील शिवसेना नेते पदावरून दूर करत आहे', असे उद्धव ठाकरेंनी पत्रात लिहिले आहे.

शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच शुक्रवारी सकाळी माध्यामांशी सवांद साधला. यावेळी बोलताना त्यांनी तीन प्रश्न उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले 'काल ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं आणि ज्यांनी हे सरकार बनवंल शिवाय तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं ते म्हणत आहेत.

मी त्यांना मागील अडीच वर्षापुर्वी हेच सांगत होतो की, आम्हाला अडीच वर्ष द्या. मात्र, त्यावेळी अमित शहा (Amit Shah) यांनी मला दिलेला शब्द पाळला नाही. जर त्यावेळी मला दिलेला शब्द पाळला असता तर काल जे घडलं ते सन्मानाने घडलं असतं. भाजप किंवा शिवसेनेचा (Shivsena) मुख्यमंत्री झाला असता.

मात्र, त्यावेळी भाजपने (BJP) का नकार दिला हा माझ्यासह जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे. दरम्यान, पाठित वार करुन शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला असं ते म्हणत आहेत. पण, शिवसेनेला बाजूला ठेवून सेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. असं म्हणत त्यांनी बंडखोरांना आणि मुख्यमंत्र्यांना सुनावलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT