केंद्रीय नेतृत्वाने सांगितल्यानेच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं : देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्रीपदावरून भाजप कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीनाट्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Saam tv

प्राची कुलकर्णी

मुंबई : काल राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. शिवाय या पदामुळे फडणवीस (Devendra Fadnavis) नाराज असल्याचं देखील बोललं जात होतं. तर फडणवीसांच्या शुभेच्छांच्या बॅनरवर केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा फोटा गायब होता. तर उपमुख्यमंत्रीपदावरून भाजप कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. भाजप (BJP) कार्यकर्त्यांच्या नाराजीनाट्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ( Devendra Fadnavis News In Marathi )

Devendra Fadnavis
शिंदे गटाच्या आमदारांचा डान्स व्हिडीओ व्हायरल; दीपक केसरकर पत्रकार परिषदेत म्हणाले...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाने सांगितल्यानेच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याची कबुली दिली आहे. पुढे फडणवीस भाजप कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले,'सरकार आपल्या हक्काचं आलं आहे. त्यामुळे कुणीही नाराज होऊ नका. सर्वांनी आता जनतेसाठी काम करा'.

दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नाराज कार्यकर्त्यांना देखील सूचना दिल्या. फडणवीस म्हणाले, '२०२४ च्या कामाला लागा. अडीच वर्षात सर्व रखडलेली काम मार्गी लावू. कुणीही कसलीही काळजी करायचं कारण नाही. हे सरकार आपलं आहे, त्यामुळे कुणीही नाराज होऊ नका. सर्वांनी आता जनतेसाठी काम करा'.

Devendra Fadnavis
आपत्तीच्या काळात संपर्क ठेवा, मी सर्वांसाठी २४ तास उपलब्ध - CM एकनाथ शिंदे

उद्धव ठाकरेंना इगो बाजूला ठेवा असं वारंवार सांगितलं होतं - देवेंद्र फडणवीस

आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनाभवन येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी मेट्रोकारशेडबाबत नवनिर्वाचित सरकारकडे एक मागणी केली होती. ठाकरे यांच्या याच मागणीवर आता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस म्हणाले, 'मेट्रोचे (Mumbai Metro) खूप काम झालं आहे. मात्र, कारशेडचे काम झाल्याशिवाय मेट्रो सुरु होणार नाही. शिवाय ठाकरे सरकाने सुचवलेली कांजूरमार्ग येथील जागा वादात आहे. ठाकरे सरकारने दिलेल्या जागेवर आता काम सुरु केलं तरी ते पुर्ण व्हायला जवळपास ४ वर्ष लागणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या हितासाठी कारशेड त्याच ठिकाणी करणार असल्याचं सांगत फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उद्धव ठाकरेंची मागणी फेटाळली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com