मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा भाजप नेते,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या घोषणेनंतर गोव्यातील शिंदेंच्या आमदारांनी हॉटेलमध्ये तुफान डान्स केला. या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्या व्हिडीओमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील त्या आमदारांना सुनावले. त्या व्हिडीओवर आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ( Deepak Kesarkar News In Marathi )
आमदार दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी आमदारांच्या व्हायरल डान्सवर भाष्य केलं. केसरकर म्हणाले,'काही आमदारांच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल करून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण ती नॅचरल रिअॅक्शन होती. 'तुम्ही चुकीचं वागला तर मी चुकीचा वागलो असं होतं' अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्हाला समजावलं'.
दरम्यान, यावेळी केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर देखील भाष्य केलं. 'उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते आहेत. त्यांच्यावर आम्ही बोलत नाही. मात्र, जर नाकापर्यंत पाणी गेलं तर विचारू करू. त्यांचा गैरसमज झालाय तो काढू. ते कुटुंबप्रमुख आहेत, त्यांच्या विरोधात आम्ही बोलणार नाही. आतातर शिवसेनेचा शाखा प्रमुख मुख्यमंत्रीपदावर बसला आहे. त्यामुळे आम्ही शिवसैनिकच आहोत', असे केसरकरांनी सांगितले.
तसेच यावेळी केसरकरांनी शिंदे यांनाही सल्ला दिला. 'केवळ आमच्यासाठी तुम्ही दररोज गोव्याला येऊ नका. आम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तुमच्याशी बोलू.दिवसभर काम आणि पुन्हा प्रवास करणे हे योग्य नाही. आरोग्य सांभाळायची गरज आहे. शिंदे हे आमच्या ५० जनांची ही इतकी काळजी घेत असतील तर महाराष्ट्राच्या जनतेची किती काळजी घेतील हे पहा', असेही ते म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.