मुंबई : मुंबई Mumbai मध्ये भाजपच्या BJP युवा मोर्चाने शिवसेने ShivSena विरोधात शिवसेना भवनावर मोर्चा काढला आहे. अयोध्येमधील श्री राम मंदिर Shri Ram Temple बांधण्यासाठी भूसंपादनाविषयी खोटे आरोप केल्याच दावा करत भाजप फटकार मोर्चा आयोजित केल होता. भाजप युवा मोर्चाचे मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे. मात्र, शिवसेना आमदार सदा सरवणकर हे शिवसैनिकांबरोबर सेनाभवन परिसरात दाखल झाले, परिसरात तणाव निर्माण झाल्याने. पोलिसांनी या परिसरात मोठा फौजफाटा तैनात केले. Shiv Sena and BJP workers clash
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे Uddhav Thackeray हे केवळ पक्षाचे अध्यक्ष नाही. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सर्वाना अधिकार आहे. पोलिसांच्या उपस्थितीत सरकार आमचे आहे .आम्ही वाटेल ती दादागिरी करु, अशी भूमिका असेल, तर ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रविण दरकेर यांनी केला आहे. भाजप कार्यालयाबाहेर आंदोलने झाली. आंदोलकांच्या अंगावर जाऊन त्यांना मारहाण करणे योग्य नाही. मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, असे प्रविण दरेकर म्हणाले आहे. काही कार्यकर्त्यांची कपडे फाडली असल्याचे समोर आले आहे.
हे देखील पहा -
भाजप युवा मोर्चाने सेना भवनावर येताच, शिवसैनिकांनी आक्रमक झाले. सेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी ततम्म झाले. एकमेकांना मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना थांबवल्या नंतर शिवसैनिकांनी तिकडे धाव घेतले, दोन्ही पक्षात प्रचंड गोंधळ उडाली. Shiv Sena and BJP workers clash
मुळात ज्यांना कायदा- सुव्यवस्था माहिती आहे, त्यांनीच कायदा- सुव्यवस्था का बिघडवायची? हा विषय इतका जोरात गाजत आहे. त्याची चौकशी व्हावी, इतकीच मागणी केली जात होती. यामध्ये दुखावण्यासारखे काय होते. प्रत्येक गोष्टीवर स्टंटबाजी का करायची? क्रियेला- प्रतिक्रिया पण असतात. प्रत्येक प्रतिक्रिया संयमी नसते. चौकशीला घाबरायचे कशाला? घाबरतच नाही, तर रस्त्यावर येण्याची गरज का भासली? असे शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले आहे.
खरं म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शिवसेना ज्या पद्धतीने पोलिसांना समोर ठेवून गुंडागर्दी, दहशतवाद, मारहाण करण्याचा प्रयत्न करत आहे. ते दुर्दैवी आहे. सत्तेचं कळस घेऊन अशा प्रकारच्या या गोष्टी महाराष्ट्रात कधीच झाले नाही. आमचा आंबेकर नावाच्या पदाधिकाऱ्यावर मारहाण झाली आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. अशा प्रकारची गुंडागर्दी योग्य प्रकारची नाही. अशा प्रकारचा संघर्ष उभा राहिला, तर त्याला वेगळं वळण पाहिलं जाईल. पोलिसांनी नियंत्रण करायला हवे. पण सरकार आमचे आहे, असे म्हणून पोलिसांसमोर वाटेल ती दादागिरी करणे चुकीचे आहे, आणि ते खपवून घेणार नाही, असे दरेकर म्हणाले आहे. Shiv Sena and BJP workers clash
भाजप कार्यकर्ते माहिम Mahim पोलीस Police ठाण्यात पोहोचले असता. विलास आंबेकर, अक्षता तेंडुलकर, सनी साठे, ऋषी शेळमकर या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याची तक्रार आणि गुन्हा दाखल करण्याकरिता भाजप कार्यकर्ते माहिम पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा हे सुद्धा माहिम पोलीस ठाण्यात दाखल झाले. अयोध्येत श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे व बनावट आरोप करत शिवसेनेने हिंदू धर्म, हिंदू धार्मिक स्थळ याचा अपमान केले आहे. भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईतर्फे शिवसेनेच्या या राजकीय षडयंत्रविरोधात “फटकार मोर्चा” आयोजित करण्यात आले आहे, हा तीव्र निषेध भाजप- शिवसेना भवनासमोर करत आहे, असे भाजप युवा मोर्चाने सांगितले आहे.
राम मंदिरासाठी जगभरामधून शेकडो कोटींचा निधी सध्या येत आहे. प्रभू रामचंद्राच्या नावाने एकही घोटाळा व्हायला नको. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये भाजपशी संबंधित काही सदस्य आहेत. शिवसेनेचा एकही सदस्य याठिकाणी नाही. रामभक्तांच्या श्रद्धेला तडा जाईल, असे काही घडू नये. ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. ते खरे की खोटे याचा लगेच खुलासा झाला तर बरं होईल. ट्रस्टने याबाबत खुलासा करायला हवे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावेळी केली होती. Shiv Sena and BJP workers clash
राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य समजले जात आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी जर करत असेल, तर त्यांच्यावरही कारवाई होणे महत्वाचे आहे. अयोध्येमधील राममंदिर हे राम भक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले आहे. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळय़ाचा डाग या मंदिरावर पडत असेल, तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना यामध्ये हस्तक्षेप करावाच लागेल, असा सल्ला शिवसेनेनं दिले आहे.
आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनी कागदपत्रावरून आरोप केले आहे. सिंह यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. तसेच हे प्रकरण ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. केवळ आपच नव्हे, तर माजी मंत्री पवन पांडेय यांनीही या घोटाळ्या झाल्याचे आरोप केले आहे.
अयोध्येमधील राम मंदिराच्या भूखंडाच्या खरेदीचा मोठा गैरव्यवहार झाल्याच दावा आपचे आमदार संजय सिंह यांनी केले आहे. राम मंदिर ट्रस्टने अवघ्या १० मिनिटातच २ कोटींचा भूखंड १८ कोटीला खरेदी केल असल्याचे धक्कादायक आरोप करण्यात आले आहे. राम मंदिरासाठीच्या भूखंड घोटाळ्याच्या आरोपाने देशभर एकच खळबळ उडाली आहे. ट्रस्टवर प्रश्नचिन्हं उपस्थित केल जात आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.