Shiv Bhojan Thali Scheme
Shiv Bhojan Thali Scheme Saam TV
मुंबई/पुणे

Shiv Bhojan Thali: शिंदे सरकार उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत; शिवभोजन थाळीबाबत घेणार मोठा निर्णय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेली शिवभोजन थाळी (Shivbhojan Thali) आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शिवभोजन थाळी सुरू ठेवायची की नाही याचा आढावा अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण घेणार आहेत. मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) या आठवड्यात अन्न व नागरी पुरवठा खात्याअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेणार आहेत. (Maharashtra Political News)

शिवभोजन थाळी योजना मविआ सरकारच्या काळात सुरू करण्यात आली होती. मात्र ही योजना नक्की कोणाच्या फायद्याची आहे याचा आढावा घेतला जाणार आहे. ही योजना बंद झाली तर मविआला हा मोठ धक्का मानला जाईल. तत्कालीन मविआ सरकारच्या अनेक निर्णयांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे. (MVA Vs Shinde Government)

या आठवड्यात अन्न व नागरी पुरवठा खात्याअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेणार आहेत. या बैठकीत शिवभोजन थाळीची खरोखर गरज आहे का? याचा विचार केला जाणार आहे. ही योजना नक्की कोणाच्या फायद्याची आहे याचाही आढावा घेतला जाणार आहे. हे सगळं पाहून कॅबिनेटसमोर शिवभोजन थाळी योजना बंद करण्याचा प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो. हा प्रस्ताव संमत झाल्यास तत्कालीन मविआ सरकारला खासकरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हा मोठ धक्का मानला जात आहे.

सध्या राज्यात १ लाख ८० हजार शिवभोजन थाळ्यांसाठी परवानगी आहे. त्यातील १ लाख ४० हजार थाळ्या दिवसाला खाल्या जातात. मागील मविआ सरकारने या थाळ्यांची संख्या २ लाखांपर्यंत नेण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, ही योजना आता वादाच्या भोवऱ्यात आणि राजकारणाच्या कचाट्यात सापडल्याने थाळीच्या लाभार्थींना या योजनेपासून मुकावे लागू शकते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha 2024: काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार; अमेठीतून तगडा उमेदवार मैदानात!

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

SCROLL FOR NEXT