Video: डम्परने १० ते १२ वाहनांना दिली जोरदार धडक; वाशी टोल नाक्यावरील थरारक घटना CCTVत कैद

Vashi Toll Naka Accident Video: ही थरारक घटना टोल नाक्यावरील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Vashi Toll Naka Accident Video
Vashi Toll Naka Accident Videoसिद्धेश म्हात्रे

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

नवी मुंबई: नवी मुंबई प्रवेशद्वारावर असणाऱ्या वाशी टोल नाक्यावर (Vashi Toll Plaza) थरारक अपघात झाला आहे. एका डम्परने जवळपास १० ते १२ वाहनांना मागून जोरदार धडक दिली आहे. टोल भरण्यासाठी ही वाहने रांगेत उभी असताना मागून अचानक एक डम्पर आला आणि त्याने रांगेत उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांना धडक दिली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र दोन जण या अपघातात जखमी झाले आहेत. ही थरारक घटना टोल नाक्यावरील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Vashi Toll Naka Accident Video)

पाहा व्हिडिओ -

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या डम्परचे ब्रेक अचानक निकामी (Fail) झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात (Accident) झाला. टोल भरण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांना या भरधाव डम्परने जोरदार धडक दिली. या धडकेत २ नागरिक जखमी झाले असून त्यांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com